murder_1.jpg
murder_1.jpg 
पुणे

हातऊसने दिलेले पैसे परत न केल्याने एकाचा खून

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दारू पिण्यासाठी व खर्चासाठी हातऊसने घेतलेले पैसे परत देत नसल्याच्या रागातून चौघांनी तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करुन खुन केला. ही घटना मंगळवारी रात्री साडे दहा वाजता कोंढवा येथे घडली. याप्रकरणी चौंघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शाहरूख उर्फ खड्या नूरहसन खान (वय 19, शिवनेरीनगर, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आकाश भरत मल्होत्रा (वय 19, रा. कोंढवा ) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन सुन्या उर्फ महेश मिसाळ याच्यासह त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरूख खान हा रंगकाम करत होता. शाहरुख व आरोपी हे एकाच परिसरात राहात असल्याने त्यांची ओळख होती. शाहरुखला दारुचे व्यसन असल्याने तो महेश मिसाळ याच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागत असे. त्यानुसार मिसाळने त्यास दारु पिण्यासाठी तसेच खर्चासाठी हातऊसने पैसे दिले होते. त्यामुळे मिसाळने त्याच्या पैशांसाठी शाहरुखकडे तगादा लावला होता. तो पैसे देत नसल्याने मिसाळच्या मनात त्याच्याविषयी राग होता.

दरम्यान, मंगळवारी रात्री शाहरूख, फिर्यादी मल्होत्रा व त्यांचे अन्य दोन मित्र मंगळवारी रात्री शिवनेरीनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ गप्पा मारत बसले होते. त्यावेळी मिसाळ हा त्याच्या साथीदारांसह तेथे आला. त्यावेळी त्याने शाहरुखकडे पैसे मागितले, मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करुन खून केला. या घटनेमुळे शाहरुखचे मित्र घाबरुन तेथून पळून गेले. रात्री दिड वाजण्याच्या सुमारास नागरिकांनी नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Fact Check: भाजप एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण रद्द करेल, असा दावा करणारा अमित शहांचा व्हायरल व्हिडिओ एडिटेड

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये होणार नरेंद्र मोदींची जाहीर सभा

संतापजनक! वन-वे रोडवर रिक्षा चालकाने अचानक यू-टर्न घेतला अन् तरुणाचा जीव गेला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT