accident.jpg 
पुणे

पुण्यात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यु; एक जखमी 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वारजे येथील बंगळुरू-मुंबई महामार्गावरील रस्त्यावरुन पायी जात असलेल्या दोन तरुणांना भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने एका तरुणाचा मृत्यु झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. 

निमबहादूर मोजी साऊद (वय 19, रा. राजगुरुनगर, खेड, मुळ रा.नेपाळ) असे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. तर ललित बलराम पुरी (वक 21, रा. राजगुरूनगर, खेड, मुळ रा. नेपाळ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनोळखी वाहनचालकाविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमबहादूर व ललित हे दोघेही मुळचे नेपाळचे असून ते राजगुरूनगर येथे राहण्यास आहेत.कामानिमित्त ते दोघे शुक्रवारी चांदणी चौकात आले होते. तेथून रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते महामार्गावरील रस्त्यावरुन वारज्याच्या दिशेने जात होते. दोघेजण वंडर फ्युचरा इमारतीसमोरील रस्त्यावर आले असताना पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामध्ये निमबहादूर याच्या डोक्‍यास, तोंडाला व हातांना जबर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यु झाला. तर ललितच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर वाहनाचालक दोघांना रुग्णालयात न पोचविता, तसेच पोलिसांना खबर न देता तेथून पळून गेला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

SCROLL FOR NEXT