corona logo 
पुणे

कोरोना असताना 'तो' गावी चालत गेला; पुण्यात केला होता मुक्काम

महेश जगताप

पुणे : सोलापूर जिल्ह्याने करोना रुग्णांची संख्या पन्नाशी गाठली आहे. पण आज पर्यंत कोरोना शहरात मर्यादित असताना त्याने ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. त्याला कारण आहे. मुंबई मधून एका युवकाने चालत मिळेल तसे गाडीवर प्रवास करीत सांगोला जिल्ह्यातील घेरडी गाव गाठले आणि समस्त गाव व आजूबाजूच्या परिसराला संकटात टाकले. 

संबंधित कोरोना रुग्ण हा अंधेरी मध्ये एका कंपनीमध्ये कामाला आहे. त्याने 14 एप्रिल रोजी, लॉकडाऊन मध्ये बरेच दिवस अडकल्याने त्याने पायीच घरी निघण्याचा निर्णय घेतला. मग त्याने काही अंतर पायी व मिळेल तशी गाडी यानुसार त्याने पुणे गाठले. दोन दिवस त्याने आपल्या पाहुण्याकडे पुण्यात मुक्काम ठोकला. तेथून पुन्हा काही अंतर चालत व काही अंतर मिळेल तश्‍या वाहनावर 17 एप्रिल रोजी घेरडी या गावी घर गाठले. पण ग्रामस्थांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याची रवानगी करून तपासणी करून घेतली. पण तपासणी मध्ये कोणतेही लक्षणे आढळली नाहीत.

23 एप्रिलला त्रास होऊ लागल्याने सोलापूरमध्ये रूगणालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्याची तपासणी केली असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. तो तरुण आल्यानंतर गावात जरी फारसा फिरला नसला तरी त्याचे चुलत भावांशी व घरच्यांशी संबंध आल्यामुळे ते लोक फिरत होते. एक भाऊ बॅंकेत कामाला आहे व चुलते पोस्टमन आहेत. त्यामुळे त्यांचे सहाजिकच त्यांचा गावातील व इतर भागातील समाजाशी संपर्क आलेला आहे. त्यामुळे गावात चिंतेचे वातावरण आहे.

रुग्णाशी आलेल्या संपर्कातील लोकांचा शोध सुरू आहे. पण तो अनेक अनोळखी लोकांच्या संपर्कात आल्याने त्यांना शोधून काढणे म्हणजे जिकरीचे काम आहे. सद्यस्थितीमध्ये घेरडी या गावच्या सीमा सील केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare Uddhav Thackeray : सुनिल तटकरेंनी उद्धव ठाकरेंना दिला तगडा झटका! रायगडमधील ठाकरेंचा प्रमुख शिलेदार राष्ट्रवादीत

Tukaram Mundhe: परदेशात एक नियम, भारतात दुसरा का? तुकाराम मुंढेंनी ग्लोबल फूड कंपन्यांना सुनावलं; नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित

Subsidy for Trekking Route Homestays: ट्रेकिंग ट्रॅकवरील गावांमध्ये 'होम-स्टे' उभारण्यासाठी सरकारी अनुदान; जाणून घ्या विशेष योजना

Thane: आश्रमशाळेतील २१ विद्यार्थिनींचा विनयभंग, ५९ वर्षीय कर्मचाऱ्याला अटक, सेवेतून निलंबित; अधीक्षिकेवरही ठपका

Maharashtra Monsoon Prediction : नागपूरच्या संविधान चौकात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT