Corona l0. 
पुणे

पुणे : केसनंदमध्ये कोरोनाचा शिरकाव; एक जणाला संसर्ग 

सकाळवृत्तसेवा

वाघोली (पुणे) : केसनंद (ता. हवेली) येथील 48 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे शनिवारी रात्री स्पष्ट झाले. त्याच्या कुटुंबातील चौघांना क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासले जाणार आहेत. त्याच्या संपर्कातील गावातील इतर 21 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. केसनंद मधील हा पहिलाच रुग्ण आहे. हा व्यक्ती एका आयुर्वेदिक संस्थेच्या डॉक्‍टरचा चालक असल्याचे समजते. 

3 ते 5 मे दरम्यान तो मुंबईत होता. तेथून परत आल्यानंतर त्याला अगदी सौम्य काही लक्षणे आढळली. त्याने त्यावर उपचार घेतले. त्यानंतर तो घरीच होता. सात तारखेला त्याला ताप आल्यानंतर त्याने खासगी लॅब मध्ये कोरोना चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने त्याला उशिरा पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या कुटुंबीयांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. यामध्ये पत्नी, दोन मुले व चुलत भावाचा समावेश आहे. त्यांचे अहवाल उद्या येणे अपेक्षित आहेत. 

दरम्यानच्या काळात त्याने एका मित्राच्या वाढदिवस पार्टीला हजेरी लावल्याचे सांगण्यात येत आहे. वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राने त्याच्या संपर्कातील 21 जणांना होम क्वारंटाइन केले आहे. तो ज्या संस्थेतील डॉक्‍टरकडे चालक होता. त्या संस्थेतही तो कोणाच्या संपर्कात आला का याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, तो राहत असलेला परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला असून सर्वेक्षणाचे कामही सुरू करण्यात आले आहे. वाघोलीत चार रुग्ण आढळून आल्यानंतर वाघोलीसह केसनंद यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले होते. 

मांजरी येथील तिघे निगेटिव्ह 
मांजरी येथील 30 वर्षीय महिला डॉक्‍टर दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. मात्र तिच्या कुटुंबातील तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मांजरी येथील एक 70 वर्षीय व्यक्तीस कोरोना झाला होता. त्याचा मृत्यू झाला. त्याच्या संपर्कातील 40 वर्षीय व्यक्तीही कोरोना बाधित झाला. त्याच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन्ही रुग्णाच्या संपर्कात ही महिला डॉक्‍टर आली होती.


पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

पहिला रुग्ण आढळल्यानंतर तिलाही क्वारंटाइन करण्यात आले होते. तिची पहिली चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र नंतरच्या चाचणीत ती पॉझिटिव्ह आढळून आली. मांजरी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. तेथे उपाययोजना सुरू आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: RBIचा मोठा निर्णय! रेपो दर किती? तुमच्या लोन, EMI आणि FDवर काय परिणाम? महागाई वाढणार?

Iran-US Ceasefire : अमेरिका-इराणमध्ये शस्त्रसंधीची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Gold Rate Today: युद्ध थांबल्याने सोन्याचे भावात अचानक मोठा बदल! काय आहे आजचा ताजा भाव?

Latest Marathi News Live Update: वर्क फ्रॉम होमच्या आमिषाने 17 लाखांची फसवणूक; एक आरोपी अटकेत

Video Viral : शार्दूल ठाकूरने बाद करताच वैभव सूर्यवंशी ढसाढसा रडला; तो फटका का खेळला? स्वतःवरच चिडला

SCROLL FOR NEXT