पुणे

पुणे : ट्रॅक्टर पलटी झाला अन् चालक...

संतोष आटोळे

शिर्सुफळ : टॅक्ट्ररसह मोकळी पाण्याची टाकी घेऊन घरी परतताना चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. यावेळी टॅक्ट्ररखाली सापडून चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शिर्सुफळ (ता. बारामती) येथे गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेत अक्षय बाळासो भारती (25 रा.शिर्सुफळ) असे दुर्दैवी मरण पावलेल्या तरुण चालकाचे नाव आहे.

अक्षय भारती हे रात्री साडेदहाच्या दरम्यान शिर्सुफळहून आपल्या दत्तवाडी येथील घरी ट्रॅक्टरसह पाणीटाकी घेऊन चालले होते. यावेळी दत्तवाडीमधील धवडे गावडे वस्तीजवळ आल्यावर तीव्र वळण व चढ आहे. याठिकाणी रस्ता दुरावस्थेमुळे टॅक्ट्ररवरील नियंत्रण सुटल्याने टाकीसह टॅक्ट्रर पलटी झाला. यावेळी टॅक्ट्ररखाली सापडून चालक अक्षय यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत विकास धनंजय भारती यांनी बारामती तालुका पोलिस स्टेशनला खबर दिली. शुक्रवार (ता.27) रोजी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर अक्षयवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रस्ता दुरावस्थेवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

रस्ता प्रश्न सुटणार तरी कधी? : ऍड. राजकिरण शिंदे

सुमारे 600 च्या आसपास लोकसंख्या असलेल्या दत्तवाडीकडे जाणारा एकमेव रस्ता आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून निम्मा रस्ता झाला आहे. तर उर्वरित रस्त्याची दुरावस्था झाली आहे.  सुमारे 30 वर्षांपासून येथील नागरिक रस्त्याची मागणी प्रशासनाकडे करीत आहेत. अनेकवेळा तहसीलदार कार्यालयाकडून पाहणी झाली. परंतु सकारात्मक निर्णय अद्याप झाला नाही. अशातच अक्षयचा दुरावस्था व अरुंद रस्त्यावरून ट्रॅक्टर रस्त्यावरून खाली घसरून पडल्याने त्यात अडकून दुर्दैवी अपघाती निधन झाले. यातून आता तरी प्रशासन बोध घेणार का ? का आणखी बळींची वाट पाहणार..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Crash : सोनं-चांदी स्वस्त झालं की गुंतवणूक बुडाली? 24 दिवसांत किमतीत तब्बल 60 हजारांची घसरण; काय घडतंय बाजारात? गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Latest Marathi News Live Update : 'आप'चे आमदार पठाणमाजरा यांना ग्वाल्हेरमधून अटक

Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

IPL 2026: मुंबईत सर्व IPL कर्णधारांची बैठक; इम्पॅक्ट खेळाडू, आचारसंहिता आणि नवीन नियमांची चर्चा होणार

SCROLL FOR NEXT