Mucormycosis Google file photo
पुणे

बारामतीकरांनो काळजी घ्या! म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असताना दुसरीकडे या विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असताना दुसरीकडे या विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे.

बारामती : म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव बारामती परिसरात वाढू लागल्याने आता बारामतीकरांपुढे नवीन संकट उभे ठाकले आहे. गेल्या दहा दिवसात बारामतीत म्युकरमायकोसिसच्या तब्बल 19 शस्त्रक्रिया झाल्या असून शनिवारी (ता.२२) या विषाणूने बारामतीत पहिला बळी घेतला. शहरातील एका महिलेचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे. या महिलेवर तीन दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती, मात्र या विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने उपचारांना प्रतिसाद न दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. (One person has died in Baramati due to mucormycosis)

बारामतीत गेल्या दहा दिवसात अठरा जणांवर शस्त्रक्रियेची पाळी आल्यानंतर आता प्रशासनही अँक्शन मोडमध्ये आले आहे. एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असताना दुसरीकडे या विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे.

बारामतीमध्ये आसपासच्या सहा तालुक्यांतून म्युकरमायकोसिसचे रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती डॉ. वैभव मदने यांनी दिली. स्वत: मदने यांनीच गेल्या दहा दिवसात विविध रुग्णालयात 18 शस्त्रक्रिया केल्या आहेत. नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने घेतलेल्या शिबिरात 14 जणांना या रोगाची लक्षणे आढळली होती. बारामतीत आता या नव्या संकटाने लोकांची चिंता वाढली आहे. प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेत काहीही लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेळीच काळजी घ्या...

दात दुखणे, गाल दुखणे, डोके तीव्रतेने दुखणे, डोळे दुखणे, दिसायला कमी येणे, सायनसचा त्रास होण्यासारखी लक्षणे असतील, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेवर निदान झाल्यास उपचाराने म्युकरमायकोसिसवर मात करणे शक्य आहे. अजिबात अंगावर दुखणे काढू नका.

- डॉ. वैभव मदने, नाक,कान, घसा तज्ज्ञ, बारामती.

पुणे जिल्ह्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT