one Police officer in Saswad suspended by Superintendent of police 
पुणे

सासवडच्या पोलीस कर्मचाऱ्याला अधीक्षकांनी केले निलंबीत; वाचा, काय आहे प्रकरण?

- श्रीकृष्ण नेवसे

सासवड(पुणे) : येथील पोलीस ठाण्यातील गुप्त विभागातील पोलीस शिपाई भाऊसाहेब नामदेव खाडे याने, गुरोळी (ता. पुरंदर) येथील एका मारामारीच्या गुन्ह्यात फिर्यादी व्यक्तीवर दबाव आणल्याप्रकरणी दखल घेत जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी खाडे यास निलंबीत केले आहे. संबंधीत गुन्ह्यातील फिर्यादीने पोलीस शिपाई खाडे याने पैसेही मागितल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. त्याबाबत व एकुणच प्रकरणाची चौकशी भोर उपविभागाचे पोलीस उप अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्याकडे पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. 


- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सासवड (ता. पुरंदर) येथील पोलीस ठाण्यात याबाबत पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी माहिती दिली की, मे 2020 पासून फिर्यादी अर्जून राजू खेडेकर यांची गुरोळीतीलच जालींदर हनुमंत खेडेकर व सहकाऱयांबद्दल वारंवार तक्रार येत आहे. अगोदर अर्जुन व जालींदर यांच्यातील जमीन वादावर तक्रार आली. नंतर दोन्ही गटाकडून महिला फिर्यादीकडून विनयभंगाच्या तक्रारी आल्या. जुलैमध्ये जालींदर खेडेकर व बाराजणांनी अर्जून खेडेकरला जुन्या वादातून छेडछाडीतून मारले. त्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे करीत असताना फिर्यादी अर्जून याने तपास अधिकारी बदलण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली. त्यानंतर हा तपास पोलीस निरीक्षक हाके यांच्याकडे आला व 13 पैकी 5 आरोपी अटक होतानाच फिर्यादी अर्जून खेडेकर व पोलीस शिपाई खाडे यांची भेट झाली. या भेटीबाबत अर्जून खेडेकर यांनी सरळ जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्याकडे तक्रार केली.

या तक्रारीबाबत पोलीस उप अधीक्षक अण्णासाहेब जाधव म्हणाले, ''अधीक्षकांकडे तक्रारीत अर्जून यांनी म्हटले आहे की, माझ्या दाखल गुन्ह्याबाबत पोलीस शिपाई भाऊसाहेब खाडे याने घरी येऊन दबाव आणला. तसेच पैशाची मागणी केली. दरम्यान, खाडे याला अधीक्षकांनी दोन दिवसांपूर्वी निलंबीत केले आहे. त्याबाबत कारवाई होऊन खाडे याची हजेरी जिल्हा पोलीस मुख्यालयात ठेवली आहे. तर एकुणच तक्रार व प्रकरणाचा तपास माझ्याकडे दिला आहे. त्याचा तपास आपण सुरु केला आहे.''  


तंत्रज्ञानाच्या युगात यशस्वी व्हायचे असल्यास स्वतःला सिद्ध करा - अच्युत गोडबोले 

पोलीसाला `पोलीस मित्र` असा भेटला...
याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणारे अर्जून खेडेकर हे `पोलीस मित्र` म्हणून काही पोलीस ठाण्यातील यंत्रणेत परिचित आहेत. पोलीस मित्र असल्याने ते पोलीस शिपाई भाऊसाहेब खाडे यांचेही खास मित्र होते. मात्र एकमेकांची जवळीक होताना.. पोलीसालाच `पोलीस मित्र` असा भेटला की.. निलंबनाची वाट दाखविली., असे सासवड पोलीस ठाण्यातून अनेक पोलीस कर्मचाऱयांनी खासगीत सांगितले. तसेच अर्जून खेडेकर यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत., असेही अधिकाऱयांनी यानिमित्ताने स्षट केले.   
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT