Sinhagad fort
Sinhagad fort 
पुणे

सिंहगडावर पहिल्याच दिवशी हजार पर्यटक 

सकाळवृत्तसेवा

खडकवासला - सिंहगड पर्यटकांसाठी खुला झाल्यानंतर पहिल्या दिवशी सुमारे एक हजार पर्यटक आले होते.  सिंहगड पर्यटकांसाठी मंगळवार पासून पर्यटकांसाठी खुला झाला. पहिल्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 147 दुचाकी, 63 मोटारी गडावर गेल्या होत्या. हॉटेल व्यावसायिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळावेत. पर्यटकांनी देखील मास्क घालणे गरजेचे आहे. सॅनिटायझरचा वापर करावा. गर्दी करून फिरू नका, असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी दीपक पवार यांनी केले आहे. 

हॉटेल व्यावसायिक पंडित यादव म्हणाले, "सकाळी येऊन साफसफाई केली. येथील साहित्य घरी नेले होते. त्याची जागेची स्वच्छता केली. दिवाळीच्या सुट्टीत गड सुरू झाला असता तर आमची दिवाळी चांगली झाली असती. 26 जानेवारीच्या पुढे पर्यटकांची संख्या कमी होते.' 

रंगुबाई शिरोळे म्हणाल्या, "गडावर हॉटेल सुरू नसल्याने यंदा भात पीक चांगले आले होते. परंतु पावसाने दगा दिला.' 

लक्ष्मण मंडले कांदा भजी तळत सांगत होते. "लॉकडाउनमध्ये नऊ महिने जगणं अवघड झाले होते. या काळात उत्पन्न नव्हते. त्यामुळे, आज गड सुरू झाला असला तरी हॉटेलमधील साहित्य उधारीवर आणले. सकाळी येऊन भांडी व परिसर स्वच्छ केला. आता आम्ही पर्यटकांची वाट बघतोय.' 

गणेश गोफणे सरबत, काकडी, शेंगा पाण्याच्या बाटल्या घेऊन विकण्यास आले होते. ते म्हणाले, "अचानक गड सुरू होणार असल्याची माहिती मिळाली. आज भारत बंद असल्यामुळे मार्केट बंद होत आणि माल भरण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे आवळे, बोरे आणली नाहीत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पर्यटक अजित मालुसरे पत्नी मुले, यांना घेऊन आले होते. काही महिन्यांपासून मोकळ्या हवेत जाऊन फिरावे असे वाटत होते. यासाठी सिंहगड कधी सुरू होईल याची आतुरतेने वाट बघत होतो. गड आज सकाळी सुरू झाल्याचे समजले आणि आम्ही लगेच निघालो. गडावर येऊन आम्हाला आनंद झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT