Onion crop endangered due to unseasonal rains and cloudy weather 
पुणे

अवकाळी पाऊस अन् ढगाळ वातावरणामुळे कांदा पीक धोक्यात

महेंद्र शिंदे

कडूस(पुणे) : अवकाळी रिमझिम पावसानंतर दाट धुके व ढगाळ हवामान या वातावरणातील बदलाचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होणार आहे. हा बदल प्रामुख्याने कांदा पिकासाठी हानिकारक ठरणार आहे.

पिकावर रोगराईच्या प्रदूर्भावाची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. कोरोना महामारी, लॉकडाउन, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, शेतमालाची थंडावलेली बाजारपेठ यानंतर पुन्हा अवकाळी पाऊस. शेतकऱ्यांवरील ही संकटांची मालिका वाढतच असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खेड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून वातावरणात एकापाठोपाठ वेगाने बदल होत आहे. दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर रविवारी (ता.13) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास परिसरात पावसाचा हलकासा शिडकावा झाला. दुसऱ्या दिवशी (सोमवारी) सकाळी अकरा वाजता पुन्हा अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. मंगळवारची सकाळ दाट धुके घेऊन आली. सोमवारी झालेल्या पावसाची ही रिमझिम सुमारे दीड तास सुरू होती. अचानक झालेल्या पावसामुळे व वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील पिकांवर रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. कांदा, बटाटा, गहू, हरभरा पीक धोक्यात आले आहे. या पावसाचा मुख्यत्वे कांदा पिकावर प्रतिकूल परिणाम होणार आहे.

हंगामाच्या सुरवातीस कांदा रोपांचा तुटवडा भासूनही शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने कांद्याची लागवड केली आहे. पावसाने झोडपल्याने कांदा रोपे हाताला लागली नव्हती. पावसापासून वाचलेल्या रोपांची लागवड केली पण पुन्हा पावसाने या रोपांची माती केली. यामुळे अनेक शेतकऱ्यांना तर दोन वेळा कांद्याची लागवड करावी लागली. त्यात सोमवारी सकाळी अवकाळी पावसाने कांद्याला झोडपले. या पावसामुळे पिकाच्या गाभ्यात माव्याचा प्रादुर्भाव वाढणार आहे. करपा रोग हातपाय पसरणार आहे.

Corona Updates: पुण्यात हॉस्पिटलमधील रुग्णांचा आकडा ३ हजारांच्या आत

काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतीसह शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडला. मात्र शेतीशिवाय पर्याय नाही, असे म्हणत शेतकरी पुन्हा उभारी घेऊन शेतात काबाडकष्ट करीत होता. आता पुन्हा अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उभारी घेतलेला शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना पुन्हा औषध फवारणीचा पंप हाती घ्यावा लागणार आहे. याबाबत कृषी विभागाचे मंडळाधिकारी विजय पडवळ, ज्योती राक्षे, मोहिनी सावंत यांनी शेतकऱ्यांना औषध फवारणीचा सल्ला  दिला आहे. ते म्हणाले, 'ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर दव जमा होईल. ते झाडाचा पाला, कापड अथवा रिकामा पंपाच्या सहाय्याने हटवले पाहिजे. तसेच जमेल तेवढ्या लवकर 'सॅफ बुरशीनाशक व सेफ्रोनील 20 ग्रॅम किंवा मार्शल 10 मिलि व स्टिकर हे 10 लिटर पाण्यातून फवारणी करायला हवी.' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

Latest Marathi News Updates : पूरग्रस्त पंजाब दौऱ्यावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे; दुधन गुजरन गावात दिलं त्वरित मदतीचं आश्वासन

Siddharth Shinde Death: Supreme Court मध्ये चक्कर आली आणि... सिद्धार्थ शिंदेंवर काळाचा घाला | Sakal News

Heavy Rain in Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; पावसामुळे नव्या खड्ड्यांची भर, मार्ग काढणेही अडचणीचे

SCROLL FOR NEXT