पुणे

दौंडमधून दररोज २५० टन कांद्याची विक्री

CD

खुटबाव, ता. १९ : कांद्याच्या बाजारभावाने चाळीसी पार केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दौंड तालुक्यातून हैदराबाद, बेळगाव, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, केडगाव, बेंगळुरू येथे विक्रीसाठी कांदा जात आहे. चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी बंदिस्त वखारी उघडून विक्रीस सुरुवात केली आहे. त्यामुळे दररोज २५० टन कांदा परराज्यात विक्रीसाठी जात आहे.

तालुक्यामध्ये गेल्या वर्षी साडेसहा हजार हेक्टर कांदा पिकाची लागवड झाली होती. कानगाव, पारगाव, वरवंड, पाटस, नानगाव, गिरीम, पिंपळगाव, राहू बेट परिसर ही गावे कांद्याचे आगर म्हणून ओळखली जातात. तालुक्यातून दररोज २५ गाड्या या बाजारपेठेमध्ये जात आहेत. परराज्यातील बाजारामध्ये बदला, चिंगळी व खराब झालेल्या कांद्याला इतर ठिकाणच्या तुलनेत चांगला बाजारभाव मिळत असल्याने प्रवास भाडे जास्त असूनही तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल या बाजारपेठेकडे असल्याचे दिसून येते.
केडगाव येथे मंगळवारी होणाऱ्या आठवडे बाजारामध्ये ८५ टन कांदा विक्रीसाठी आला. यावेळी शेतकऱ्यांना सर्वोच्च ४३ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. तालुक्यामध्ये पारगाव व कानगाव परिसरामध्ये गेले २० वर्षांपासून कांद्याची लागवड करणारे अनेक शेतकरी आहेत. त्यामुळे कांदा लागवडीपासून ते कांदा विक्रीपर्यंतचे सर्व अनुभव पाठीशी असल्याने दरवर्षी उसाबरोबर शेतीमध्ये कांदा लागवडीस प्राधान्य दिले जाते. मागील वर्षीच्या तुलनेत कांद्याला किमान चांगला बाजारभाव मिळाला असल्याने प्रत्येक पिशवीमागे शेतकऱ्यांना किमान १८०० ते दोन हजार रुपये मिळत आहेत.


माझ्या वखारीमध्ये १ हजार कांदा पिशव्या होत्या. सध्या दररोज त्यापैकी २० ते ३० पिशव्यांची परराज्यात विक्री होते. कांदा आणण्यासाठी पूर्वीपेक्षा खर्च वाढला आहे, त्यामुळे चांगला बाजारभाव मिळाल्याने समाधानी आहे.
- रमेश बोत्रे, कांदा उत्पादक, पारगाव (ता. दौंड)

03806

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: "आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का?"; सुप्रीम कोर्टाने थेट विचारलं, नार्वेकरांचा आदेशही रद्द केला जाऊ शकतो

FDA Action: तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन मोड सुरूच! मालाड, कुर्ला, खारघरमधील खाद्य आस्थापनांवर एफडीएची कारवाई

ENG VS PAK 1ST TEST: तुला पाच, मला पाच! इंग्लंडच्या गोलंदाजांचा कहर, पाकिस्तानचे बारा वाजवले; पहिल्याच दिवशी जागेवर आपटले...

Latest Marathi News Live Update : तहसीलदाराला उडवून देण्याची धमकी

Lakshya Sen: पहिला गेम जिंकूनही लक्ष्य सेनचा धक्कादायक पराभव! १८ वर्षीय गॅरेट टॅनने कमबॅक करत भारतीय स्टारचं आव्हान केलं संपुष्टात

SCROLL FOR NEXT