पुणे

लोणंदल - लोणंद बाजारात कांद्याचे भाव घसरले

CD

कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी हताश

उत्पादन खर्चही निघेना; शासनाने हमीभाव देण्याची मागणी

लोणंद, ता. १ : सध्या बाजारात गरव्या कांद्याच्या मागणीच्या प्रमाणात अधिक आवक सुरू असल्याने कांद्याचे भाव प्रतिक्विंटल ४५० ते ११०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, उत्पादन खर्चही पदरी पडेना, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हताश झाला आहे. शासनाने कांद्याला कमीत कमी १८०० ते २००० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलला हमीभाव द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.
गेल्यावर्षी कांद्याच्या भावाबाबत हीच गत झाली होती. कांद्याला चांगला भाव न मिळाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आले होते. मात्र, गेल्या वर्षी बाजारभावाच्या बसलेल्या फटक्याची तमा न बाळगता यावर्षीही लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांद्याच्या लागवडी केल्या आहेत. त्यातून पोषक हवामानामुळे कांद्याचे उत्पन्नही चांगले निघत असल्याने बाजारात गरव्या कांद्याची मोठी आवक होत आहे. मात्र, कांद्याचे दर ४५० ते ११०० रुपयांपर्यंत ढासळले आहेत.
यावर्षी दिवाळीनंतर डिसेंबर ते जानेवारीच्या मध्यापर्यंत कांद्याला प्रतिक्विंटलला २५०० ते २६०० रुपयापर्यंत भाव मिळला. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कांद्याच्या लागवडी मोठ्या प्रमाणात केल्या. मात्र, फेब्रुवारीपासून कांद्याचे भाव ४५० ते २२०० रुपयांवरून २१००, २०००, १८००, १४००, १२०० व आता ११०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघेना, अशी अवस्था झाली आहे. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर व बारामती तसेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून कांद्याचे उत्पन्न घेतात. कांद्याच्या पिकांवरच येथील शेतकऱ्यांची अनेक आर्थिक गणते अवलंबून असतात. मात्र, कांदा दरवेळेस चांगले पैसे हाती पडण्यापासून शेतकऱ्यांना हुलकावणी देत आहे. त्यामध्ये शासनाचे निर्यातीबाबतचे धोरण, कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ, वाढता उत्पादन खर्च व त्या तुलनेत बाजारात मिळणाऱ्या कांद्याला भाव यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सातत्याने अडचणीचा सामना करत आहे.
लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या कांद्याच्या लिलावात गरव्या कांद्याच्या १२ हजार पिशव्यांची आवक होऊन भाव प्रतिक्विंटलला ४५० ते १२१० रुपयांपर्यंत निघाले. शेळी, मेंढी बाजारात प्रतिनगास सहा हजार ते १५ हजार, तर बोकड प्रतिनग आठ हजार ते ५५ हजार रुपये भावाने विकले.
जनावरांच्या बाजारात गाय ४० हजार ते एक लाख, तर म्हैस ४५ हजार ते एक हजारांपर्यंत प्रतिनगास भाव निघाले.


कोट :
सध्या बाजारात कांद्याची मागणीपेक्षा अधिक आवक होत आहे. देशातील कांद्यासाठी मोठी बाजारपेठ असलेल्या बांगलादेशाकडून यावर्षी कांद्याला म्हणावी तेवढी मागणी होत नसल्याने कांद्याच्या निर्यातीवर मर्यादा आल्या आहेत. अत्यल्प निर्यात होत आहे. जिथे रोज एक लाख टन होणारी कांदा निर्यात सध्या दोन-चार कंटेनरच होत आहे. त्यातून चीन व पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणावर बांगलादेशात कांदा येत आहे. बांगलादेशानेही स्वतःचे कांद्याचे उत्पन्न वाढवले आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतच कांदा पाठवावा लागत असल्याने कांद्याच्या भावाची ही स्थिती आहे.
- बिपिन शहा, कांद्याचे व्यापरी, लोणंद मार्केट यार्ड

कोट :
कांदा लागवडीसाठी मशागत, रोप, खुरपणी, खते, फवारणी, काढणी काटणी, वाहतूक, आडत हमाली, मोकळे बारदान एक पिशवी १४ रुपयाला त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही. यासाठी कांद्याला कमीत कमी दोन हजार रुपयांपर्यंत हमीभाव मिळावा.
बाबूराव भिकू वाघमोडे, शेडगेवाडी, (ता. खंडाळा) कांदा उत्पादक शेतकरी
---
फोटो :
04364,04365
लोणंद : लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर गुरुवारी व सोमवारी गरव्या कांद्याची मोठी आवक होत आहे. बाजारात झालेली कांद्याची आवक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 वर नवं संकट, स्पर्धा आधीच दोन दिवस पुढे ढकलावी लागतेय, त्यात आता रद्द होतेय की काय ही भीती... नेमकं काय कारण?

Shocking: दुर्दैवी! चालत्या स्कूल बसची फरशी अचानक तुटली; चिमुकली पडून चाकाखाली आली अन्...; भावासमोरच करूण अंत

Ferry Boat: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबई ते विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा सुरू, प्रवासाचा वेळ आणि खर्च किती?

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणातील नियुक्त्या अवैध; पगार वसुलीचे निर्देश, फाइल, आदेश नसलेल्या शिक्षकांवर कारवाई

Nashik Kumbh Mela : सिंहस्थासाठी नाशिक सज्ज! १० हजार स्वयंसेवक आणि होमगार्ड्स सांभाळणार भाविकांच्या सुरक्षेची धुरा

SCROLL FOR NEXT