आळेफाटा, ता. १६ : कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या आळेफाटा येथील दुय्यम बाजार आवारात रविवारी (ता. १५) कांद्याची ४ हजार ७२५ गोण्यांची आवक झाली. त्यातून २ हजार ३६२ क्विंटल कांद्याची विक्री झाली. बाजारात गोळा कांद्याला प्रतिदहा किलोला ४६१ ते ४९५ रुपये, तर सुपर कांद्याला ४२० ते ४६० रुपये बाजारभाव मिळाला.
गोल्टी आणि गोल्टा कांद्याला ३५० ते ४०० रुपये, तर बदला व चिंगळी कांद्याला १७० ते ३४० रुपये भाव मिळाला. दरम्यान, नवीन कांद्याची २३५ गोण्यांची आवक झाली असून, त्याला प्रतिदहा किलोला २०० ते ४५१ रुपये बाजारभाव मिळाला.
गेल्या दीड महिन्यापासून साठवून ठेवलेला गावरान कांदा आता संपत आल्याने बाजारातील त्याची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचवेळी पावसाळी हंगामातील नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. आगामी काही दिवसांत गावरान कांद्याची आवक आणखी घटून नवीन लाल कांद्याची आवक वाढण्याची शक्यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली.
नवीन लाल कांद्याची आवक सुरू झाल्याने आगामी काळात बाजारभावात काय बदल होतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. उत्पादन खर्च, मजुरी, वाहतूक आणि साठवणुकीचा खर्च विचारात घेता कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळावेत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. ही माहिती बाजार समितीचे सभापती ॲड. संजय शिवाजीराव काळे, उपसभापती निवृत्ती मुरलीधर काळे, सचिव रूपेश कवडे, संचालक प्रीतम काळे आणि कार्यालय व्यवस्थापक सतीष म्हस्करे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.