पुणे

‘कांदा खरेदी १२ रुपयांनी’

CD

‘कांदा खरेदी १२ रुपयांनी’

सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : ‘‘राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या वर्षभरापासून आर्थिक कोंडीत सापडले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने ते हवालदिल आहेत. या परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार ‘नाफेड’च्या माध्यमातून १२ रुपये ३५ पैसे प्रतिकिलो या दराने कांद्याची खरेदी करणार आहे,’’ अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सातारा येथे केली.
सैनिक स्कूलच्या मैदानावर शुक्रवारी (ता.१५) पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा व महाआवास अभियानच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम चौहान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्या वेळी चौहान बोलत होते. पहिल्या टप्प्यात नाशिकपासून ही कांदा खरेदी सुरू होणार आहे. मात्र नेमकी खरेदी केंद्रे कोणती, याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नसल्यामुळे केंद्रावर विक्रीसाठी कुठे जायचे? असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये आहे.

क्षेत्रीय पातळीवर गोंधळ
केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन नोडल एजन्सीजमार्फत प्रत्येकी एक लाख याप्रमाणे एकूण २ लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घोषणा केली असली तरी याबाबत खरेदीच्या अनुषंगाने क्षेत्रीय पातळीवर गोंधळ आहे. दोन्ही एजन्सी सहकारी संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदी करणार आहेत. मात्र या संस्थांकडून अद्यापही खरेदीदारांची अंतिम नावे शुक्रवारपर्यंत (ता.१२) जाहीर करण्यात आलेली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT