आळेफाटा, ता. १३ ः आळेफाटा येथील उपबाजारात मंगळवारी (ता. १३) कांद्याच्या १२ हजार ५३९ पिशव्यांची आवक झाली. या वेळी एक नंबर गोळा कांद्यास प्रति दहा किलोला १४० रुपये बाजारभाव मिळाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, संचालक प्रीतम काळे, सचिव रूपेश कवडे व व्यवस्थापक सतीश म्हस्करे यांनी दिली. दरम्यान, कांद्याला ३ ते १४ रुपये प्रति किलो दर मिळत असून यामधून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
जुन्नर बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात एक नंबर कांद्यास प्रति दहा किलोला १३० ते १४० रुपये, दोन नंबर कांद्यास १२० ते १३० रुपये, तीन नंबर गोल्टी कांद्यास १०० ते १२० रुपये तर चार नंबर बदला, चिंगळी कांद्याला ३० ते ८० रुपये बाजारभाव मिळाला. कांद्याला उत्पादन खर्चाएवढाही बाजारभाव मिळत नसल्याने उपबाजारात अतिशय कमी कांदा विक्रीसाठी आला होता. इंधनाचे वाढलेले दर, मजुरी, मशागत खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली वाढ, रासायनिक खते तसेच औषधांच्या वाढलेल्या किमती यांमुळे उत्पादन खर्चात गेल्या वर्षीच्या तुलनेने दुप्पट वाढ झाली आहे. सध्या मिळत असलेला बाजारभाव हा कमी असल्याने कांदा चाळीत साठवून ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.