पुणे

फलटण मार्केट यार्डात कांद्याचे दर तेजीत

CD

फलटणमध्ये कांद्याचे दर तेजीत
दुधेबावी, ता. १५ : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात मंगळवारी (ता. १५) कांद्याच्या दरात तेजी दिसून आली. कांद्याला किमान एक हजार ५०० रुपये, कमाल पाच हजार रुपये, तर सरासरी दोन हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी दिली आहे.
फलटण बाजार समितीत मंगळवारी कांद्याची एकूण ९६१ क्विंटल आवक झाली. ही आवक १ हजार ९२२ पिशव्यांमधून झाली. बाजारात कांद्याला मागणी असल्याने कमाल दराने पाच हजार रुपयांचा टप्पा गाठला. सरासरी दर दोन हजार ८०० रुपये राहिल्याने शेतकऱ्यांचे लक्ष बाजारातील पुढील दरांकडे लागले आहे. दरम्यान, रविवारी (ता. १३) फलटणच्या मुख्य बाजारात विविध शेतमालाचे दर पुढीलप्रमाणे होते. ज्वारीला दोन हजार ६०० ते पाच हजार ६०० रुपये (आवक ४९ क्विंटल), बाजरी दोन हजार ५०० ते तीन हजार ५० रुपये (१०६ क्विंटल), गहू दोन हजार ५०० ते दोन हजार ८५० रुपये (६२५ क्विंटल), हरभरा सहा हजार ते सहा हजार ८०० रुपये (५५ क्विंटल), मका दोन हजार २०० ते दोन हजार ८०० रुपये (६२ क्विंटल), खपली चार हजार २११ रुपये (११ क्विंटल), उडीद सात हजार ते सात हजार ६०० रुपये (६ क्विंटल), तर मूगाला आठ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT