पुणे

चाकण बाजारात कांद्याच्या भावात तेजी

CD

चाकण, ता. ९ : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारात चांगल्या प्रतीच्या कांद्याला बुधवारी (ता. ९) प्रतिकिलोस सुमारे ५० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. बाजारभावात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

बाजारात कांद्याची एक हजार क्विंटल आवक झाली. बाजारात आवक आणि मागणी यातील तफावत, तसेच दर्जेदार कांद्याची मर्यादित उपलब्धता यामुळे भावावर परिणाम झाला आहे. विशेषतः साठवणूक करून ठेवलेला चांगल्या प्रतीचा कांदा बाजारात विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना सध्याच्या भाववाढीचा फायदा होत आहे. मात्र, किरकोळ बाजारात कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याने बजेट कोलमडण्याची चिंता गृहिणींकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, किरकोळ बाजारात कांदा प्रतवारीनुसार ५० ते ८० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. पुढील काळात बाजारातील कांद्याची आवक, मागणी, दर्जानुसार भावात चढ-उतार होण्याची शक्यता अधिक आहे.
वखारीत, छपरीत ठेवलेला कांदा विक्रीसाठी येत आहे. त्याचे सडण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे प्रतवारीनुसार चांगल्या कांद्याला प्रतिकिलो ५० रुपये तर छोट्या आकाराच्या कांद्याला २० ते ३० रुपये बाजारभाव मिळाला, असे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक राक्षे, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले.

सध्या मोजक्याच शेतकऱ्यांकडे तसेच व्यापाऱ्यांकडे कांदा विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे कांद्याची आवक घटलेली आहे. जुना कांदा बाजारात विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत. यावर्षी राज्याच्या काही भागात पडलेल्या दुष्काळामुळे तसेच काही भागातील पूरस्थितीमुळे पावसाळी कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढत आहेत.
- महेंद्र गोरे, व्यापारी, संचालक, खेड कृषी उत्पन्न बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT