पुणे

पुणे - कांद्याचे दर वाढल्याने चोऱ्यांमध्ये वाढ

CD

कांद्याचे दर वाढल्याने चोऱ्यांमध्ये वाढ

औरंगपूर येथे ५१ गोणी कांद्याची चोरी

ॲग्रोवन वृत्तसेवा
नारायणगाव, जि. पुणे ः कांद्याचे दर वाढल्याने कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. औरंगपूर (ता. जुन्नर) येथील कांदा चाळीत साठवून ठेवलेल्या प्रत्येकी ५० किलो वजनाच्या ५१ गोणी कांद्याची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. या प्रकरणी कांदा उत्पादक शेतकरी प्रभाकर संभाजी भापकर यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिली.
ऐन दिवाळीच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकऱ्याला एक लाख दहा हजार रुपयांचा फटका बसला आहे. कांद्याला बाजारभाव वाढल्याने चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भापकर हे कुटुंबासमवेत निमगाव सावा येथे राहतात. औरंगपूर येथील त्यांच्या शेतात कांदा चाळ आहे. बाजारभाव वाढल्यानंतर विक्री करण्याच्या उद्देशाने त्यांनी एप्रिल महिन्यात काढलेला कांदा चाळीत साठवून ठेवला होता. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कांदा विक्रीचा निर्णय घेतला होता. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी मजुरांच्या साह्याने चाळीतील कांदा ५३ गोण्यांमध्ये भरून ठेवला होता. २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ते शेतावर गेले असता, ५३ पैकी ५१ गोण्या चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. चाळीबाहेर वाहनाच्या टायरच्या खुणा आढळून आल्या. याबाबत भापकर यांनी २ नोव्हेंबर रोजी नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मोठा भांडवली खर्च करून उत्पादित केलेल्या कांद्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्याने भापकर यांना मोठा मनस्ताप झाला आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी भापकर कुटुंबीयांनी केली आहे.

शेतीमालासह पशुधनाच्या
चोरीच्या घटना
शेतातील द्राक्ष, सोयाबीन, डाळिंब, कांदा या पिकांसह बैल, गाय, म्हैस, शेळ्या या पाळीव जनावरांच्या चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. पाळीव जनावरे, काढणीस तयार झालेला शेतमाल याबरोबरच कृषिपंप आणि केबलच्या चोऱ्याही वारंवार होत आहेत. द्राक्ष, सोयाबीन आणि पाळीव जनावरे चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे. मात्र, चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांची लडाखमधील शाळा बंद करा! प्रशासनाने का पाठवली नोटीस?

Beed News: बीड नगर परिषदेच्या सभेत रणकंदन! महिला नगरसेविकांच्या अवमानाचा आरोप; भाजपची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Neha Bora: मंदिरातील अत्याचाराच्या वक्तव्यावरुन भाजपचा नेहा बोरांवर जोरदार हल्ला; काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही जाहीर केली नाराजी

Crime News: यूपीतील भाजप नेत्याच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल! व्हिडिओमध्ये कोणावर केले आरोप? 'माझ्या मृत्युला पत्नी...'

Maharashtra Drought Relief: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा! मराठवाड्यातील ४८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची अग्रीम मदत जमा होण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT