Indian Navy Recruitment esakal
पुणे

भारतीय नौदलात अधिकारीपदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

भारतीय नौदलात अधिकारी होण्याची संधी युवक युवतींना मिळणार आहे. नौदलाच्या वतीने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) अंतर्गत अधिकारी पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - भारतीय नौदलात अधिकारी होण्याची संधी युवक युवतींना मिळणार आहे. नौदलाच्या वतीने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) अंतर्गत अधिकारी पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात विविध विभागांमध्ये १८१ जागांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत.

ही प्रवेश प्रक्रिया महिला व पुरुष उमेदवारांसाठी असून यामध्ये लेखी परिक्षा नसून थेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (एसएसबी) मुलाखती होणार आहेत. त्यासाठी पदवीतील गुणांच्या आधारावर उमेदवारांना एसएसबी प्रक्रियेसाठी निवडण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई, बी.टेक, एम.ए, बी.एस्सी, बी.कॉम, एम.एस्सी किंवा एमसीए केलेल्या उमेदवारांना अर्ज भरता येईल. तसेच, उमेदवारांना पदवी किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये ६० टक्के गुण मिळवलेले असणे आवश्‍यक आहे.

यासाठी उमेदवारांना ५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येईल. इच्छुक उमेदवारांना याबाबतच्या अधिक माहिती किंवा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी  joinindiannavy.gov.in या नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल. तसेच, इच्छुक उमेदवारांना २१ सप्टेंबरपासून अर्ज भरता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

SCROLL FOR NEXT