Online Admission Sakal
पुणे

भारतीय सैन्यदलाच्या वतीने 'टीजीसी-१३७' प्रवेशासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली

भारतीय सैन्यदलाच्या वतीने ‘टेक्निकल ग्रॅज्युएट कोअर्स’च्या (टीजीसी-१३७) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती.

अक्षता पवार

भारतीय सैन्यदलाच्या वतीने ‘टेक्निकल ग्रॅज्युएट कोअर्स’च्या (टीजीसी-१३७) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती.

पुणे - भारतीय सैन्यदलाच्या वतीने ‘टेक्निकल ग्रॅज्युएट कोअर्स’च्या (टीजीसी-१३७) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. मात्र काही कारणास्तव ही अर्ज प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून याबाबतच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती सैन्यदलाच्या वतीने देण्यात आली आहे.

सैन्यदलातर्फे दरवर्षी दोनदा टीजीएस प्रवेश प्रक्रिया आयोजित केली जाते. तर टीजीसी-१३७ व्या अभ्यासक्रमाची सुरवात ही जुलै २०२३ पासून सुरू होणार असून अभियांत्रिकीची पदवी असलेल्या उमेदवारांना यात प्रवेश दिला जाणार आहे. ही प्रक्रिया केवळ पुरुष उमेदवारांसाठी आहे. टीजीसी अंतर्गत ४० जागा राखीव ठेवण्यात आली आहे. यामध्ये बी.ई, बी.टेक पदवी असलेले किंवा अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना टीजीसी प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेता येईल. यासाठी वयोमर्यादा २७ वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

प्रवेश प्रक्रियेअंतर्गत लेखा परीक्षा नसून सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (एसएसबी) मुलाखतींद्वारे उमेदवारांची निवड केली जाते. यासाठी पदवीतील गुणवत्तेच्या आधारावर एसएसबीसाठी उमेदवारांची निवड केली जाते. तर एसएसबी प्रक्रिया उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना डेहराडून येथील इंडियन मिलिटरी ॲकॅडमीमध्ये (आयएमए) प्रशिक्षण दिले जाईल.

दरम्यान, सध्या या प्रक्रियेला पुढे ढकलण्यात आले असून अर्ज प्रक्रियेशी निगडित नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. या प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी तसेच अर्ज करण्यासाठी www.joinindianarmy.nic.in या सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. असे आवाहन सैन्यदलातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मृणाल दुसानिसने अमेरिका का सोडली? सांगितलं खरं कारण; म्हणाली, 'आमचं नवीन लग्न झालेलं तेव्हा...'

Toxic Cough Syrup: पेंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकलचा खोकल्याच्या औषधात वापर? १४ हुन अधिक मुलांचा मृत्यू

Fadnavis Interview: मोदींना आंबा, तर फडणवीसांना संत्रा… अक्षय कुमार पुन्हा ट्रोल; मुख्यमंत्र्यांनी दिलं भन्नाट उत्तर!

ऐश्वर्याचं सुपरहिट 'कजरा रे' गाणं गाणाऱ्या गायिकेला मिळालेलं निव्वळ इतकं मानधन; म्हणाली "माझी किंमत नाही"

Leopard Attack Sangli : आजोबांसोबत शेतात गेलेल्या ४ वर्षीय आरववर बिबट्यानं मारला पंजा अन्.., नातवाला वाचवण्यासाठी आजोबा बनला 'छावा'

SCROLL FOR NEXT