Online booking for Rajiv Gandhi Zoo finally started pune marathi news sakal
पुणे

Rajiv Gandhi Zoo : अखेर राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाचे ऑनलाई बुकिंग सुरु

पर्यटकांची प्रतिक्षा संपली; घरबसल्या करता येणार बुकिंग

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज : राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाला भेट देण्यासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरु झाले आहे. अनेक दिवसांपासूनची पर्यटकांची प्रतिक्षा अखेर संपली असून रांगेत उभे राहून तिकीट काढावे लागणार नसल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

तिकीटासाठी आता रांग लावण्याची गरज लागणार नाही. दिवाळीच्या मूहूर्तावर प्राणी संग्रहालय प्रशासनाकडून ऑनलाइन तिकीट उपलब्ध करून देण्यात येत असून त्यासाठी संकेतस्थळ बनविले आहे. अनेक वर्षांपासून प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची गर्दी वाढत होती. दरवर्षी लाखो पर्यटक येथे येऊन प्राण्यांना पाहण्याचा आनंद लुटतात. मात्र, सुटीच्या दिवशी तर प्राणिसंग्रहालयाच्या खिडकीवर तासन् तास रांगा लावून तिकीट घ्यावे लागत असे, आता या त्रासातून मुक्ती होणार आहे.

तिकीट घेण्यासाठी खिडकीवर खूप गर्दी होत असे. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय व्हायची. त्यामुळे आम्ही ऑनलाइनचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामुळे घरबसल्या सर्वांना तिकीट लगेच मिळणार आहे. ते बुकिंग प्रवेशद्वारावर दाखविले की आत प्रवेश मिळेल. सोबतच तिकीट खिडकीवरही तिकीट काढता येईल. दोन्ही पर्याय खुले असल्याने आता रांगेत उभे राहून तिकीट काढण्याची वेळ पर्यटकांवर येणार नसल्याचे प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी सांगितले आहे.

पर्यटकांना https://zooticket.pmc.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन तिकीट काढता येईल. नेट बँकिंग किंवा यूपीआयचा पर्याय निवडून तिकीटाची रक्कम अदा करता येणार आहे. संकेतस्थळावर प्राणिसंग्रहालयाची संपूर्ण माहिती देण्यात आली असून कोणते प्राणी आहेत, भविष्यातील योजना काय याचीही माहितीदेखील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्राणिसंग्रहालय दर बुधवारी बंद असणार त्यामुळे त्यादिवशीचे तिकीट काढता येणार नाही. तसेच अपंग व्यक्तींनी तिकीट काढण्याची गरज नसून त्यांना प्रवेश मोफत प्रवेश असणार आहे.

कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात रांगेत उभे राहून तिकीट काढावे लागत असल्याने चिडचिड व्हायची. मात्र, आता ऑनलाईन पर्याय उपलब्ध झाल्याने त्रास होणार नाही. त्यामुळे गैरसोय होणार नाही. मुलांसह बिनधास्त प्राणी पाहण्याचा आनंद लुटता येईल.

- मंगेश भगत, पर्यटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishnaraj Mahadik : मनसेच्या चोरांना भाजपच्या पोरांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं, भाजप युवा नेते कृष्णराज महाडिकांची मनसेला वॉर्निंग

Jalgaon Bypass Flyover Collapse : खर्च वाचविण्यासाठी वाहनधारकांच्या जिवाशी खेळ; अपघातांमागे 'बायपास'चे निकृष्ट काम; कंत्राटदारावर थेट गुन्हा दाखल

OBC Creamy Layer : केंद्र सरकारला झटका ! ओबीसी क्रिमी लेयरवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; UPSC सह १८ राज्यांतील भरतीवर परिणाम?

होलसेल बदलामागचं लॉजिक काय? Shahid Afridi ने पाकिस्तान संघाचे वाभाडे काढले; म्हणाला, ट्वेंटी-२० तील खेळाडू कसोटी संघात...

Marathi News Live Updates : अकलूज RTO कार्यालयात धक्कादायक प्रकार; चक्क स्वच्छतागृहाच्या जागेतच चहा-कॉफीची कँटीन

SCROLL FOR NEXT