Online Counseling sakal
पुणे

Online Counseling : विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी ऑनलाइन समुपदेशन सेवा कार्यान्वित

यासाठी मंडळाने भ्रमणध्वनी दिले असून त्याद्वारे समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून आठ दिवस सकाळी आठ ते रात्री आठ यावेळेत उपलब्ध राहतील.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

Online Counseling - मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ऑनलाइन समुपदेशन सेवा सुरू करण्यात आली आहे.

राज्य मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांसाठी ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. निकालानंतर काही विद्यार्थ्यांना नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता आहे. अशा विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी ही सेवा सुरू केली आहे.

यासाठी मंडळाने भ्रमणध्वनी दिले असून त्याद्वारे समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून आठ दिवस सकाळी आठ ते रात्री आठ यावेळेत उपलब्ध राहतील. विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे नि:शुल्क आवश्यक ते समुपदेशन करण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

इन्फोबॉक्स -

राज्य मंडळाने समुपदेशनासाठी दिलेले काही भ्रमणध्वनी क्रमांक -

  • ७३८७४००९७०

  • ८३०८७५५२४१

  • ९८३४९५१७५२

  • ९४०४६८२७१६

  • ८७६७७५३०६९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT