पुणे

भविष्यात ऑनलाइन न्यायप्रक्रियेला महत्व ः मुकेश शर्मा

CD

भविष्यात ऑनलाइन
न्यायप्रक्रियेला महत्व ः शर्मा
अहिल्यानगर, ता. १२ ः ग्राहक आयोगामध्ये वाढत्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी आभासी पद्धतीने (व्हिडिओ कॉन्फरन्स) सुनावणी प्रक्रिया ही काळाची गरज बनली आहे. वाढत्या तक्रारी आणि अपुरे मनुष्यबळ याची सांगड तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडविता येणार आहे. भविष्यात फिजिकल सुनावणी कमी होऊन ऑनलाइन सुनावणीकडे सर्वांचा कल राहणार आहे, असे प्रतिपादन राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष मुकेश शर्मा यांनी केले.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये आभासी पद्धतीने (व्हिडिओ कॉन्फरन्स) सुनावणी सेवेचा प्रारंभ राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष मुकेश शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. टीव्ही सेंटर येथील प्रशासकीय इमारतीतील ग्राहक आयोगाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या पूनम महर्षी, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगचे अध्यक्ष सादिक अली बशीर सय्यद, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग सदस्या चारू डोंगरे, संध्या कसबे, अधीक्षक कविता कोमार, ग्राहक तक्रार निवारण आयोग वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सुनील मुंदडा, विशेष सरकारी वकील सुरेश लगड आदी उपस्थित होते.
शहर बार असोसिएशन उपाध्यक्ष ॲड. भाऊसाहेब घुले, सेंट्रल बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. फारुख शेख, सचिव ॲड. अभिजीत देशपांडे, कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शिवाजी कराळे आदी उपस्थित होते. ॲड. शुभांगी बाबर यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. सिद्धांत गांधी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Auction Live: अमरावतीची लेक, Mumbai Indians च्या ताफ्यात! फ्रँचायझीने ऑलराउंडरसाठी किती रक्कम मोजली? RCB च्या WPL विजेत्या संघाची होती सदस्य

Marathi News Live Updates : नांदेडमध्ये सहकार विभागाची अवैध सावकारीविरोधात धडक कारवाई; एकावर गुन्हा दाखल!

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Narendra Modi Post: ''बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, मग काँग्रेसने किती जागा जिंकल्या?'', पंतप्रधान मोदींची पोस्ट, विरोधकांना चिमटा

Islapur News : रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळा एकाच शिक्षकाच्या भरोशावर! २५ विद्यार्थ्यांचे चार वर्ग सांभाळताना शिक्षकाची कसरत

SCROLL FOR NEXT