Online_education 
पुणे

Video : 'ऑनलाइन एज्युकेशन' आले लहान मुलांच्या डोळ्यावर!

सकाळ वृत्तसेवा

सहकारनगर : जे आई-वडील हातातला मोबाईल हिसकावून घेत होते, तेच पालक कोरोना काळात मुलांच्या हातात मोबाईल देऊन अभ्यास करायला बसवत आहेत. आता हे ऑनलाइन मोबाईल शिक्षण मुलांच्या डोळ्याचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहे. कोरोनाच्या काळातील ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे लहान मुलांच्यामध्ये चष्म्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईल, टॅब, संगणक, लॅपटॉप अशा डिव्हाईसचा वापर वाढला गेला. त्यामुळे दिवसभरात किमान चार ते पाच तास मुलांच्या डोळ्यांपुढे कोणत्या न कोणत्या प्रकारचा स्क्रीन डोळ्यासमोर येऊ लागल्याने त्याचा थेट परिणाम चष्म्याचा नंबर वाढण्यात झाला असल्याचे निरीक्षण नेत्ररोग तज्ज्ञांनी नोंदविले आहे. याबाबत सहकारनगर येथील बाल नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद वाळिंबे यांनी लहान मुलांच्यामध्ये वाढते चष्म्याचे प्रमाण यांतील कारण आणि उपाय 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

कारणे : 
- मुलांच्या पालकांना चेष्मा असेल तर आनुवंशिक लहान मुलांच्यामध्ये ही वाढण्याची शक्यता असते.
- जन्मतःच लहान मुलांचे वजन कमी असेल, तर मुलांना चष्मा लागतो.
- ऑनलाइन शाळेमुळे मोबाईल, टॅब, संगणक, लॅपटॉप अशा डिव्हाईसचा वापर वाढला गेल्याने चष्म्याचे प्रमाण वाढत आहे
- अभ्यासाव्यतिरिक्त अति वापर केल्याने चष्म्याचा नंबर वाढण्याची व्याधी वाढत आहेत.

उपाय : 
- मोबाईल, टॅब, संगणक, लॅपटॉप अशा डिव्हाईसचा योग्य आणि थोड्या वेळेसाठीच वापर करावा.
- मोबाईल, टॅब, संगणक, टीव्ही लांबून अंतर ठेवून पाहावे.
- अभ्यासाव्यतिरिक्त लहान मुलांनी मैदानी खेळावर लक्ष द्यावे.
- पौष्टिक आणि चौरस आहार घ्यावा.
- नियमित व्यायाम करावा, सकाळच्यावेळी स्वच्छ सूर्यप्रकाश घ्यावा 
- वृत्तपत्र वाचन, लेखन, चित्रकला, संगीत, नृत्य, कला इ. छंद जोपासावे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT