पुणे

शेतमोजणीसाठी शेतकऱ्यांची वणवण

CD

शेतमोजणीसाठी शेतकऱ्यांची वणवण
--
खासगी केंद्रांत १०० रुपये शुल्कवसुली
--

ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : शेतमोजणी अर्ज प्रक्रियाही आता पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आल्याने शेतकऱ्यांची गैरसोय वाढली आहे. पूर्वीप्रमाणे भूमी अभिलेख विभागात ऑफलाईन अर्ज स्वीकारले जात नसल्याने शेतकऱ्यांना महा ई-सेवा केंद्रांची मदत घ्यावी लागत आहे. यासाठी प्रत्येकी सुमारे १०० रुपये खर्च करावे लागत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

पूर्वी शेतमोजणीसाठी थेट भूमी अभिलेख विभागात अर्ज स्वीकारले जात होते. अर्जाच्या स्वरूपानुसार शुल्क भरून त्याची पावती विभागात जमा केल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जात होती. मात्र आता संबंधित पोर्टलवर ऑनलाईन अर्ज दाखल करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अनेक शेतकऱ्यांना ही प्रक्रिया स्वतः करता येत नसल्याने त्यांना महा ई-सेवा केंद्रांवर अवलंबून राहावे लागत आहे. पेपरलेस कामकाजाच्या उद्देशाने ही पद्धत सुरू करण्यात आली असली, तरी अर्ज प्रक्रियेवरील अतिरिक्त खर्चामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

चौकट : अनेक अर्ज प्रलंबित

भूमी अभिलेख विभागाकडे शेतमोजणीचे अनेक अर्ज प्रलंबित असल्याची माहिती आहे. ऑनलाईन अर्ज करूनही मोजणीची तारीख किंवा पुढील कार्यवाहीबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. अर्जाची पावती घेऊन शेतकरी कार्यालयात जात असले, तरी त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. निवडणुकीच्या कालावधीत प्रशासकीय दुर्लक्ष झाल्याचाही परिणाम या प्रक्रियेवर झाल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT