सकाळ कार्यालय (बुधवार पेठ) - ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या बैठकीत ‘पुणे कंझ्युमर डिस्ट्रिब्यूटर्स असोसिएशन’चे सदस्य. 
पुणे

ऑनलाइन, मॉलमुळे बेरोजगारीत वाढ

सकाळवृत्तसेवा

पुणे - ऑनलाइन खरेदी आणि मॉलमुळे साखळी व्यापार पद्धत विस्कळित झाली आहे. या साखळीतील वितरक हा घटक नाहीसा होत चालला आहे. त्यामुळे मालाचे वितरण करणारे आणि त्यावर अवलंबून असणारे काही लाख पुणेकर बेरोजगार होण्याची भीती ‘पुणे कंझ्युमर डिस्ट्रिब्यूटर्स असोसिएशन’च्या सदस्यांनी व्यक्त केली. 

‘सकाळ’ने आयोजित केलेल्या बैठकीत कंझ्युमर डिस्ट्रिब्यूटर्स संघटनेच्या सदस्यांनी ही माहिती दिली. या वेळी संघटनेचे अध्यक्ष संजय बोगावत, आनंद मुनोत, संदीप जालान, दिनेश मेहता, सुभाष मेहता, प्रवीण सांकला, विजय शहा, रोहित चोरडिया, राजेंद्र मेहता आणि व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळिया उपस्थित होते. 

ऑनलाइन खरेदी व मॉलमुळे पारंपरिक व्यापाराची पद्धत पूर्ण बदलली. ऑनलाइन आणि मॉलमध्ये वस्तू कमी किमतीमध्ये मिळत असल्याने नागरिक त्याकडे वळतात. मात्र त्या पद्धतीत ठराविक वस्तूच कमी किमतीत मिळतात; तसेच नको असलेली खरेदीही ग्राहकाकडून करण्यात येते. त्या पद्धतीच्या प्रतिसादामुळे साखळी पद्धत विस्कळित झाली असून त्याचे दुष्परिणाम दिसू लागले असल्याचे सदस्यांनी सांगितले. सौंदर्य प्रसाधने आणि बेकरी-डेअरी आदींचे खाद्यपदार्थ यांचा समावेश फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्‌समध्ये होतो. या पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची ही संघटना आहे.

मॉलना केवळ ‘बिझनेस टू कन्झ्युमर’ (बी टू सी) म्हणजेच विक्रेता ते खरेदीदार अशा विक्रीसच परवानगी असताना ते बेकायदा बिझनेस टू बिझनेस (बी टू बी) म्हणजेच एका व्यावसायिकाकडून दुसऱ्या व्यावसायिकास अशी विक्री करीत आहेत. ‘बी-टू-बी’मुळे आणि परकीय गुंतवणुकीस १०० टक्के परवानगी दिल्याने पारंपरिक व्यापाऱ्यांपुढे समस्या निर्माण झाल्या. सरकारने यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा या व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

पुणे कंझ्युमर डिस्ट्रिब्यूटर्स असोसिएशनची स्थापना १९९७
पुण्यातील व्यापाऱ्यांची संख्या सुमारे १०००
संघटनेची सदस्य संख्या ३८०
शहरातील वार्षिक उलाढाल १० हजार कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT