पुणे

मराठा सोयरिक संस्था

CD

जाहिरातीची बातमी ----------------
‘सोयरा मराठा’तर्फे ‘ऑनलाइन
वधू-वर परिचय मेळावा’
अहिल्यानगर, ता. २ : मराठा समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींना योग्य जीवनसाथी शोधण्यासाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘सोयरा मराठा’ या विवाह संस्थेच्या वतीने मोफत ऑनलाइन वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. ६) सकाळी ११ वाजता ऑनलाइन पद्धतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती सोयरा मराठाचे संस्थापक अशोक दाणी यांनी दिली.
आजच्या धावपळीच्या युगात विवाह जुळविताना अनेक अडचणी येत आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, शहर, अपेक्षा आणि बदलती जीवनशैली यामुळे योग्य स्थळ शोधण्याची प्रक्रिया अधिक अवघड झाली आहे. विशेषतः उच्चशिक्षित आणि करिअरला प्राधान्य देणाऱ्या युवक-युवतींसाठी योग्य स्थळ शोधणे हे मोठे आव्हान झाले आहे. ‘सोयरा मराठा’च्या माध्यमातून ही गरज लक्षात घेऊन ऑनलाइन वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेर शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायानिमित्त स्थायिक असलेल्या मराठा समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे. ऑनलाइन स्वरूपामुळे विविध शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या वधू-वरांना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ वधू-वरांची ओळख करून देणे नसून, विचार, शिक्षण, करिअर, कुटुंबीय पार्श्वभूमी आणि अपेक्षा यांचा योग्य मेळ साधून जीवनसाथी शोधण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करणे हा आहे. संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ४ हजार ७० पेक्षा अधिक विवाह जुळले आहेत. २०१६ पासून सुरू असलेला हा विवाह जुळवणीचा प्रवास सातत्याने सुरू आहे. या मोफत ऑनलाइन वधू-वर परिचय मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अधिक माहितीसाठी ९८२२२६४००३ व ९६०७४४४००३ क्रमांकावर संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SBIच्या ग्राहकांनो लक्ष द्या! 'या' दिवशी UPI सेवा राहणार बंद; आर्थिक व्यवहार करण्यासाठी दिला पर्याय

Pune Mobile Recovery : ओतूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; तांत्रिक तपासातून २५ गहाळ मोबाईल शोधून सहा लाख ५० हजारांचा मुद्देमाल मालकांना परत

SCROLL FOR NEXT