Corona Vaccination Sakal
पुणे

पुण्यात ऑनलाईन नोंदणीमुळे लसीकरणातील गोंधळाला ब्रेक

पुणे महापालिकेने १८ ते४४ वयोगटाच्या लसीसाठी १०० टक्के ऑनलाईन बुकींग सुरू केल्याने सोमवारी केंद्रांवरील गोंधळ कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महापालिकेने (Municipal) १८ ते ४४ वयोगटाच्या लसीसाठी १०० टक्के ऑनलाईन बुकींग (Online Booking) सुरू केल्याने सोमवारी केंद्रांवरील गोंधळ (Confusion) कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. उद्या (मंगळवारी) २०२ ठिकाणी लसीकरण (Vaccination) होणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. (Online Registration in Pune Breaks the Chaos in Vaccination)

४५ ते पुढील वयोगटासाठी कोव्हीशील्ड १२८ केंद्र, १४ ते ४४ गटासाठी कोव्हीशील्डचे ५८ तर कोव्हीक्सीनचे १६ केंद्र आहेत. ऑनलाईन नोंदणी मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.

कोव्हीशील्ड (४५ ते पुढील वयोगट)

- ६ एप्रिल पूर्वी पहिला डोस (८४ दिवस) घेतला आहे त्यांना ३० टक्के लस ऑनलाईन नोंदणी द्वारे उपलब्ध.

- फ्रंटलाइन कर्मचारी व थेट केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी ३० टक्के लस राखीव

- २० टक्के लस ऑनलाईन नोंदणी करून आलेल्यांच्या पहिल्या डोससाठी

- २० टक्के लस थेट केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांच्या पहिल्या डोससाठी राखीव

कोव्हीशील्ड (१८ ते ४४ वयोगट)

- १०० टक्के लस ऑनलाईन बुकींगद्वारे उपलब्ध

- ऑनस्पॉट लस मिळणार नाही.

कोव्हॅक्सीन (१८ ते पुढील वयोगट)

- ३१ मे पूर्वी पहिला डोस घेणाऱ्यांना दुसरा डोस मिळणार

- ५० टक्के लस ऑनलाईन बुकींगद्वारे उपलब्ध

- ५० टक्के लस थेट केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांसाठी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT