Rickshaw 
पुणे

रिक्षा ‘ऑनलाइन’; भाडे ‘ऑफलाइन’

सचिन बडे

पुणे - प्रवाशांना सहज आणि गतिमान वाहतूक सेवा पुरविण्यासाठी ऑनलाइन प्रवासी वाहतूक करणाऱ्या ‘कॅब’ कंपन्यांकडून शहरात ऑनलाइन रिक्षा सेवा सुरू आहे. मात्र, ऑनलाइन पैसे घेण्यास चालक टाळाटाळ करीत आहेत.

‘ऑनलाइन’ पैसे नाकारण्याचे प्रकारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. कंपनीकडून रिक्षाचालकांना प्रवास भाड्याचे पैसे उशिराने मिळतात. मात्र, चालकांना रिक्षाला ‘सीएनजी गॅस’ भरण्यासाठी व अन्य खर्चासाठी रोख पैसे हवे असतात. यातून ऑनलाइन पैसे नाकारण्याचे प्रकार घडतात. 

प्रवाशांनी ‘ॲप’वर रिक्षा बुक करताना ऑनलाइन पैसे हा पर्याय निवडला तर काही वेळा रिक्षाचालक कारणे सांगून बुकिंग रद्द करण्यास सांगतात, अशी तक्रार अनेक प्रवासी करीत आहेत. ऑनलाइन प्रवास सेवा पुरवणाऱ्या ‘कॅब’ कंपन्यांचे शहरातील शेकडो रिक्षाचालक सदस्य आहेत. यातील काही रिक्षाचालकांकडून प्रवास भाड्याचे पैसे ऑनलाइन पद्धतीने नाकारण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, अशा प्रकारची एकही तक्रार आली नसल्याचे एका ‘कॅब’ कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

प्रवासाला सुरवात करताच रिक्षाचालकाने रोख पैसे आहेत का असे विचारले असता, मी ऑनलाइन पैसे भरणार असल्याचे सांगितले. यावर प्रवासास नकार देत पुन्हा मूळ ठिकाणी आणून सोडले. 
- सचिन वाघ, नागरिक 

ऑनलाइन प्रवास सेवा पुरविणाऱ्या ‘कॅब’ कंपन्यांची रिक्षा सेवा मोटार वाहन कायद्यामध्ये येत नाही, त्यामुळे अशा प्रकारची प्रवासी वाहतूक बेकायदा आहे. 
- नितीन पवार, रिक्षा पंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT