Online-School 
पुणे

Coronavirus : आता भरू लागल्या ऑनलाइन शाळा

सकाळवृत्तसेवा

पुणे - आपत्तीतही विधायक संधी शोधणाऱ्या शिक्षण संस्था कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयग्रस्त वातावरणात विद्यार्थ्यांचे हित जोपासत आहेत. राज्य सरकारने शाळांना सुटी दिली असली, तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विविध ॲप्लिकेशनचा वापर करीत या संस्था दररोज विद्यार्थ्यांची ऑनलाइन शाळा भरवू लागल्या आहेत.

शिवणे आणि फुरसुंगी परिसरातील वॉलनट शाळा आणि पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी प्रशाला ऑनलाइन ॲपचा वापर करून घरबसल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करून घेत आहेत. कोरोनामुळे परीक्षेसाठीदेखील विद्यार्थ्यांना घराबाहेर पडावे लागू नये, यासाठी या शाळा ऑनलाइन परीक्षा घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

याविषयी वॉलनटच्या संचालिका अर्पिता करकरे म्हणाल्या, ‘‘आम्ही गुगल मीट आणि गुगल क्‍लासरूमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे दररोज वर्ग घेत आहोत. मुलांची ऑनलाइन पद्धतीने शाळा भरविली जात आहे. परीक्षादेखील दोन पद्धतीने होईल. वस्तुनिष्ठ प्रश्‍नांद्वारे ऑनलाइन परीक्षा होईल आणि वर्णनात्मक प्रश्‍नांसाठी विद्यार्थ्यांना ॲपद्वारे प्रश्‍न पाठविले जातील. ते सोडवून विद्यार्थ्यांनी त्याचा फोटो काढून पाठविला, की त्याचे मूल्यमापन केले जाईल.’’

ज्ञानप्रबोधिनीचे प्राचार्य मिलिंद नाईक म्हणाले, ‘‘आमचे शिक्षक घरी बसून विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करीत आहेत. ते झूम ॲपद्वारे मुलांचे वर्ग घेत आहेत. शाळेच्या वेळापत्रकानुसार त्या त्या विषयाचे धडे त्यांना दिले जात आहेत. प्रात्यक्षिक घेण्यात अडचणी येतात, मात्र त्याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. विद्यार्थी, पालकांकडूनही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 18 लाख एरियर? काय आहे चर्चेतील गणित? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

Madha Ganeshotsav : माढ्याची अनोखी गणेशोत्सव परंपरा! आगमनही अन् विसर्जनही मिरवणुकीविना, अनेक वर्षांची परंपरा

दुष्काळ जाहीर झाला... मदत कधी मिळणार?

Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ३ कंटेनरचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू; रस्त्यावर सांडले फेविकॉल, वाहतुकीवर परिणाम

SCROLL FOR NEXT