online system urban poor health scheme pune sakal
पुणे

आॅनलाइन प्रणालीमुळे शहरी गरीब योजनेतील गडबड उघडकीस

शहरी गरीब वैद्यकीय सहाय योजनेत १ लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना आर्थिक मदत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरी गरीब योजनेतील एजंटगिरी रोखता यावी यासाठी कार्ड काढण्याची प्रक्रिया आॅनलाइन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका मोठ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्र रुग्णाला उपलब्ध करून देऊन १ लाख रुपये मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकरणाचा भांडाफोड झाला.

त्यामुळे आता या रुग्णालयाला नोटीस पाठवली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.शहरी गरीब वैद्यकीय सहाय योजनेत १ लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे गरीब नागरिकांसाठी ही योजना वरदान ठरली आहे.

पण यामध्ये एजंट घुसले असून, फोटोशॉपमध्ये उत्पन्नाच्या दाखल्यावरील नावात बदल करून या योजनेचा लाभ मिळवून देत आहेत. त्याबदल्यात ठराविक रक्कम कमिशन म्हणून घेत आहेत. हे प्रकार वाढल्याने प्रशासनाने ही सर्व योजना आॅनलाइन प्रणालीमध्ये आणण्याचा निर्णय घेतला.

दोन दिवसांपासून ही आॅनलाइन सुविधा सुरू झाली. त्यावेळी एका बड्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाइकांना महापालिकेच्या योजनेतून १ लाख रुपये मिळवून देतो. त्यासाठी काही टक्के कमिशन द्यावे लागले असे सांगितले.

त्यानंतर रुग्णालयाकडे असलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यासह इतर कागदपत्र जोडून महापालिकेकडे पाठवले. पण कागदपत्रांची पडताळणी करताना हा प्रकार समोर आला. संबंधित रुग्णाकडे चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. यासंदर्भात संबंधित रुग्णालयाला पत्र पाठवून यापुढे असे प्रकार घडल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून अशी नोटीस बजावण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे.

तसेच महापालिकेच्या पॅनलवर असलेल्या इतर रुग्णालयांना खबरदारी घ्यावी यासाठी पत्र पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी असा प्रकार घडलाच नाही असे सांगत या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT