artificial intelligence sakal
पुणे

कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंगचे ऑनलाइन प्रशिक्षण

कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशिन लर्निंगच्या विविध गोष्टींवर प्रशिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती व संसाधनांचा वापर.

सकाळ वृत्तसेवा

कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशिन लर्निंगच्या विविध गोष्टींवर प्रशिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती व संसाधनांचा वापर.

पुणे - संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ), ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी’च्या (डीआयएटी) वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशिन लर्निंग या विषयावरील १२ आठवड्यांचा ऑनलाइन प्रशिक्षण कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्कील इंडिया मिशन’ अंतर्गत सायबर सुरक्षा साध्य करण्यासाठी मानवी कौशल्य-संच तयार करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.

काय असणार आहे?

या कोर्समध्ये संभाव्यता सिद्धांत, डेटा, अल्गोरिदम, ऑग्मेंटेड रियालिटी, संगणक भाषा प्रक्रिया सारख्या आधुनिक विषयांचा समावेश असेल. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशिन लर्निंगच्या विविध गोष्टींवर प्रशिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती व संसाधनांचा वापर केला जाणार आहे.

शास्त्रज्ञांची व्याख्याने

डीआयएटी, डीआरडीओ, उद्योग आणि विद्यापीठांमधील नामवंत प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांची व्याख्याने प्रशिक्षणादरम्यान आयोजित केले जाणार आहेत. ऑनलाइन परीक्षा, प्रात्यक्षिके अशा विविध परीक्षांच्‍या आधारावर कोर्समधील प्रशिक्षणार्थ्यांचे मूल्यमापन करत त्या आधारावर प्रमाणपत्रे प्रदान केले जाणार आहे. डीआयएटीने या पूर्वी सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंगमध्ये ऑनलाइन प्रशिक्षणाच्या दोन कोर्स यशस्वीपणे पार पाडले. त्यामध्ये १५०० हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देत प्रमाणपत्रे देण्यात आली.

हे लक्षात ठेवा...

  • हा अभ्यासक्रम १२ आठवड्यांचा

  • जुलै २०२२ पासून सुरू

  • कोणत्याही शाखेतून पदवी किंवा नोकरी करणाऱ्यांना अर्ज करता येणार

  • १० जुलै रोजी घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणे गरजेचे

  • इच्छुक उमेदवारांनी ८ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्‍यक

  • संबंधित संपूर्ण माहिती, वेळापत्रक, अर्ज करण्यासाठी उमेदवारांना www.diat.ac.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT