पुणे, ता. १४ : बँक कर्जे, प्रकल्प वित्तपुरवठा, विमा, न्यायालयीन प्रकरणे, आयकर तसेच मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसाठी अचूक मालमत्ता मूल्यांकनाची गरज वाढत आहे. या पार्श्वभूमीवर स्थावर संपदा मालमत्ता मूल्यांकन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी १६ नोव्हेंबरपासून १० दिवसांची ऑनलाइन कार्यशाळा आयोजिली आहे. कार्यशाळेत जमीन व इमारतींचे मूल्यांकन, बाजारमूल्य निश्चितीच्या पद्धती, रेडी रेकनरचा वापर, घसारा, बांधकाम खर्चाचे विश्लेषण, प्रत्यक्ष मालमत्ता पाहणी, मूल्यांकन अहवाल तयार करणे तसेच बँका व वित्तीय संस्थांच्या निकषांविषयी मार्गदर्शन केले जाईल. प्रशिक्षण दोन आठवडे ऑनलाइन आणि एक दिवस प्रत्यक्ष प्रात्यक्षिक अशा स्वरूपात होईल. स्थापत्य अभियंते, वास्तुविशारद, पदवीधर आणि रिअल इस्टेट व्यावसायिकांना रोजगारासह स्वतंत्र मूल्यांकन सल्लागार म्हणून व्यवसाय सुरू करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५
लीव्ह अँड लायसन्स मास्टरक्लास
मालमत्ता भाड्याने देताना आजकाल बहुतांश लोक ‘रेंट’ किंवा ‘लीज’ कराराऐवजी ‘लीव्ह अँड लायसन्स’ पद्धत पसंत करत आहेत. मात्र, योग्य करारनामा तयार करणे, कागदपत्रांची पूर्तता, स्टॅम्प ड्यूटी व नोंदणी शुल्काची गणना, शासकीय पोर्टलवर फी भरणे, बायोमेट्रिक प्रक्रिया, तसेच पोलिसांना कळवणे हे सर्व टप्पे तांत्रिक ज्ञानाशिवाय अवघड ठरू शकतात. याचसाठी याबाबत मार्गदर्शन करणारा मास्टरक्लास १९ नोव्हेंबरला आयोजिला आहे. यामध्ये प्रत्यक्ष डेमोसह करार तयार करण्यापासून ग्राहकाला मंजूर प्रत सुपूर्द करण्यापर्यंतची प्रक्रिया शिकवली जाणार आहे. तसेच, ११ महिन्यांच्या कराराची नोंदणी बंधनकारक का आहे, कोणती कागदपत्रे लागतात, पोलिस इंटिमेशनचे महत्त्व आणि सरकारमान्य स्वरूपांचा वापर याबाबतही माहिती दिली जाणार आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५
फळे-भाजीपाला डिहायड्रेशन तंत्रज्ञान
फळे, भाजीपाला सुकविण्याच्या प्रक्रियेला डीहायड्रेशन म्हणतात. पाण्याचा अंश काढल्याने फळे-भाजीपाला अधिककाळ टिकविता येतात. अशा निर्जलीकरण केलेल्या नाशवंत पदार्थांना स्थानिक व परदेशी बाजारात वाढती मागणी आहे. याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २१ व २२ नोव्हेंबरला आयोजिली आहे. यामध्ये विविध पालेभाज्या, फळभाज्या, कंदमुळे, फळे, फुले यांचे निर्जलीकरण प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येणार आहे. या प्रक्रियेद्वारे भुकटी कशी तयार करावी याचेही प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन होणार आहे. यात प्रक्रियेसाठी लागणारी मशिनरी, व्यवसायासाठीच्या संधी, उद्योगासाठी गुंतवणूक, शासनाच्या अनुदान योजना, मार्केट कॉस्ट, प्रॉडक्शन कॉस्ट, बाजारपेठ, मार्केटिंग, प्रकल्प अहवाल व प्रकल्पाच्या किमतीविषयी मार्गदर्शन होईल. विद्यार्थी, गृहिणी, प्रक्रिया उद्योजक आदींसाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६
गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन प्रशिक्षण
सोसायटी मॅनेजर या करिअर संधीविषयीचे तीन दिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण एसआयआयएलसी, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ म. यांच्यातर्फे २७, २८ व २९ नोव्हेंबरला आयोजिले आहे. यामध्ये सोसायटी मॅनेजरची कर्तव्ये, प्रोफाइल आणि जबाबदाऱ्या, मॅनेजिंग कमिटी अजेंडा व मिनिट्स लेखन, गृहनिर्माण संस्थेतील शेअर्स आणि व्याजाचे हस्तांतर, देखभाल बिले तयार करणे, टीडीएस भरणे, ऑडिटसाठी चेकलिस्ट, लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, सोसायटीचे वार्षिक विवरणपत्र सादर करणे आदी विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक अनुभवाची संधीही दिली जाणार आहे. सोसायटी व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी हे प्रशिक्षण विशेष उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.