RTE 
पुणे

RTE च्या राखीव जागांवर अद्याप केवळ ३६ टक्के प्रवेश

निवड यादीतील विद्यार्थ्यांना ९ जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार

मिनाक्षी गुरव

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्यांपैकी केवळ ३६ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ही प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्याने त्याकडे पालकांनी पाठ फिरविली असल्याचे दिसत आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आता ९ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.(Only 36 percent access to RTE reserved seats so far)

आरटीईतंर्गत २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात प्रवेशाच्या लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सध्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. जूनमध्ये अखेर या प्रक्रियेला गती मिळाली. लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ३० जूनपर्यंत प्रवेशाची मुदत यापूर्वी दिली होती. आता ही मुदत ९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील ९६ हजार ६८४ जागांवरील प्रवेशाच्या सोडतीत जवळपास ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. आतापर्यंत त्यातील ३८ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी तात्पुरते प्रवेश घेतले आहेत. तर २९ हजार ६९० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.

निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उर्वरित रिक्त जागांकरिता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी प्राधान्य क्रमानुसार संधी दिली जाणार आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत प्रवेशाच्या पोर्टलवर स्वतंत्र सूचना देणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

पालकांसाठी सूचना :

  • - प्रवेशासाठी पालकांनी शाळेत गर्दी करू नये

  • - फक्त निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीच ॲलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी

  • - दिलेल्या मुदतीनंतर निवड यादीतील संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही

  • - एकाच पालकांनी दोन अर्ज भरला (डुप्लिकेट) असेल आणि लॉटरी लागली तरीही त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाईल

आतापर्यंत झालेल्या प्रवेशाचा जिल्हानिहाय आढावा

जिल्हा : आरटीई २५ टक्के जागा राखीव असलेल्या शाळा : उपलब्ध जागा : निवड झालेले विद्यार्थी : तात्पुरते झालेले प्रवेश : निश्चित झालेले प्रवेश

पुणे : ९८५ : १४,७७३ : १४,५६७ : ६,९८१ : ३,७६९

नगर : ४०२ : ३,०१३ : २,७५३ : १,६६१ : १,१८७

नाशिक : ४५० : ४,५४४ : ४,२०८ : १,९९९ : १,९००

ठाणे : ६७७ : १२,०७४ : ९,०८८ : ३,२५६ : ३,४९७

नागपूर : ६८० : ५,७२९ : ५,६११ :३,४२२ : १,१४२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20I Ranking : कुलदीप यादवला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून मध्येच बाहेर करणे पडले महागात, आयसीसीने दिला दणका...

Thane News: पाणी टंचाईच्या झळा, पण बेकायदा वॉशिंग सेंटरमधून सर्रास पाण्याची उधळपट्टी, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण

Ozar News : पोलीस बनले समुपदेशक! नाशिकमध्ये अपहरणाचा बनाव करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पोलिसांनी केले समुपदेशन, पालकांना दिला योग्य सल्ला

Mangalwedha News : मंगळवेढ्यात नगराध्यक्षपदासाठी उच्च शिक्षित महिलांच्या दावेदारीची चर्चा

Nashik Crime : नाशिकमध्ये 'एमडी' तस्कराच्या मुसक्या आवळल्या; ६५ हजार रुपयांचे ड्रग्ज जप्त, मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल.

SCROLL FOR NEXT