Corona Patient Sakal
पुणे

दिलासादायक! पुणे शहरात आता फक्त ८०५ सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक

पुणे शहरात आता फक्त ८०५ सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत. यापैकी अवघ्या ८७ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून उर्वरित ७१८ जण गृहविलगीकरणात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहरात आता फक्त ८०५ सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत. यापैकी अवघ्या ८७ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून उर्वरित ७१८ जण गृहविलगीकरणात आहेत.

पुणे - पुणे शहरात (Pune City) आता फक्त ८०५ सक्रिय कोरोना रुग्ण (Corona Patients) शिल्लक राहिले आहेत. यापैकी अवघ्या ८७ रुग्णांवर विविध रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू असून उर्वरित ७१८ जण गृहविलगीकरणात आहेत. जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १२८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याउलट ३९७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील ७८ रुग्ण आहेत. दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये २५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १४, नगरपालिका हद्दीत एक आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १० नवे रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही दीड हजारांपर्यंत खाली आली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण १ हजार ५६२ सक्रिय रुग्ण आहेत.

एकूण सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील ८०५ जणांसह पिंपरी चिंचवडमधील ३१९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ३४१, नगरपालिका हद्दीतील ५५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ४२ रुग्ण आहेत. दिवसभरात दोन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे व पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी एक मृत्यू आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने रोज रात्री कोरोना शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा अहवाल प्रसिद्घ केला जातो. त्यातून हे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E85 Fuel: केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोलपेक्षा स्वस्त E85 इंधन लॉन्च; आता किती आणि कशी बचत होणार?

महिलेचा गोळी लागून मृत्यू, भाजप आमदाराला कोर्टानं ८ वर्षांनी ठरवलं दोषी

मान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री! रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोल्हापूरचा काही भाग व्यापला; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

IND vs AFG: विराट कोहलीच्या बदली खेळाडूची BCCI ने केली घोषणा! ऋतुराज नाही, तर 'या' खेळाडूला मिळाली वनडे संघात जागा

Latest Marathi News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पीएम-आर्थिक सल्लागार परिषदेची महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT