saurabh-pharate 
पुणे

सौरभ फराटे यांच्या स्मारकाची फक्त घोषणाच

संदीप जगदाळे

हडपसर - देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा सौरभ फराटे यांचे स्मारक उभारण्याची घोषणा तत्कालीन महापौर प्रशांत जगताप यांनी केली होती. त्यासाठी राज्य सरकारतर्फे मदत करणार असल्याची ग्वाही माजी आमदार विजय शिवतारे यांनी दिली होती. मात्र ३ वर्षे झाली, तरी अद्याप स्मारकासाठी जागा उपलब्ध झालेली नाही. याबाबत फराटे कुटुंबीयांनी ‘सकाळ’शी बोलताना प्रशासन व लोकप्रतिनिधींविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

जम्मू-काश्‍मीरमधील पम्पोर शहरात भरगर्दीच्या ठिकाणी १७ डिसेंबर २०१६ रोजी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात फुरसुंगी येथील जवान सौरभ हे हुतात्मा झाले होते. त्यांचे स्मारक उभारण्यासाठी पुणे महापालिकेकडून प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध केला जात आहे. मात्र, स्मारकासाठी जागा मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून कोणतीही हालचाल दिसत नाही. 

सौरभ यांचे वडील नंदकुमार फराटे म्हणाले, ‘‘अद्याप सौरभ यांच्या स्मारकाबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. अनेक वेळा सत्ताधारी पक्ष आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, याची दखल न घेतल्याने महापालिकेसमोर मी व माझ्या पत्नीने बेमुदत उपोषणदेखील केले. त्या वेळी हे काम लवकर मार्गी लावू, असे लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिले. मात्र, आजही स्मारकाचा प्रश्न ‘जैसे थे’च आहे.’’ 

सौरभ यांचे भाऊदेखील लष्करातून सेवानिवृत्त झाले आहेत. ते म्हणाले, ‘‘आमदार मुक्ता टिळक यांनी महापौर असताना स्मारकासाठी तीन जागांची पाहणी केली होती. यामध्ये महापालिकेची कै. रामचंद्र बनकर शाळा, शहीद हेमंत करकरे उद्यान आणि लष्कराच्या सोसायटीतील ॲमेनिटी स्पेसच्या १० गुंठे जागेची त्यांनी पाहणी केली होती. मात्र, महापालिकेच्या अथवा शासनाच्या शाळेच्या आवारात कोणतेही स्मारक उभे न करण्याचे राज्य शासनाचे पत्र आम्हाला दाखविण्यात आले. तर, शहीद हेमंत करकरे उद्यान हे पाटबंधारे विभागाच्या जागेत आहे, ती जागा अथवा लष्कराच्या सोसायटीतील ॲमेनिटी स्पेसची जागा स्मारकासाठी उपलब्ध व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींकडून व प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होताना दिसत नाही.’’

देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांच्या स्मारकावरदेखील राजकारण केले जात आहे.
- मंगल फराटे, सौरभ यांच्या आई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT