Only clinics will now continue in the restricted area 
पुणे

पुण्यातला मोठा निर्णय : 'या' परिसरात जीवनावश्यक वस्तूंची दुकानंही बंद!

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात (कन्टेन्मेंट झोन) आता जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने देखील उघडी ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी उद्या (सोमवार) रात्री बारा वाजल्यापासून पुढील रविवार (ता. 17) लागू राहणार आहेत. त्यामुळे या भागात केवळ दवाखाने सुरू राहणार आहेत. याबाबतचे आदेश नव्याने महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी रविवारी काढले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा 

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ती रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपयोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात रुग्णांची संख्या वाढत असलेल्या परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. असे सुमारे 69 झोन पुणे शहरात आहेत. या झोनमध्ये जीवनावश्‍यक वस्तू आणि दवाखाने सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त गायकवाड यांनी 3 मे रोजी दिले होते. त्यानुसार या झोनमध्ये ही सुरू होती. परंतु या झोनमध्ये सेवा देणाऱ्या दुकानांच्या ठिकाणी देताना अथवा घेताना सामासिक अंतराचे (फिजिकल डिस्टसिंग) पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या भागातील कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविणे आवश्‍यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आयुक्त गायकवाड यांनी आदेशात म्हटले आहे. त्यामुळे या प्रतिबंधित क्षेत्रात आता केवळ दवाखाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनावश्‍यक वस्तूंसह सर्व प्रकाराची दुकाने रविवार दि. 17 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोनाग्रस्तांवर उपचार करून घरी परतली नर्स; पतीने केले अशाप्रकारे स्वागत...

प्रतिबंधित क्षेत्रात आवश्‍यकता भासल्यास दूध, भाजीपाला तसेच इतर आवश्‍यक वस्तूंचा पुरवठा पुणे महापालिका आणि पोलिस प्रशासन यांच्या वतीने घरपोच देणे अथवा या क्षेत्रात असलेल्या मोठ्या मोकळ्या जागेवर सुरक्षित अंतराचे पालन करून उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय लवकर घेण्यात येणार आहे, असेही आयुक्त गायकवाड यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. 

घराच्या ओढीने काळीज तुटत होतं, पण असा झाला घोळ... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : 'राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत अजित पवार एकटेच चर्चा करायचे', भाजपच्या विश्वासाने विलीनीकरण होणार; हसन मुश्रीफांची माहिती

दोन न्यायाधीशांमध्ये काय बिनसलं? Supreme Court च्या टीकेनंतर हायकोर्ट न्यायमूर्तींची खटल्यातून माघार, CJI सूर्यकांतांकडे विनंती

BJP Party Fund : भाजपला सर्वाधिक देणग्या; ‘एडीआर’चा अहवाल; काँग्रेस दुसऱ्या स्थानावर

Latest Marathi News Live Update : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार

अशी मध्येच कशी संपली? 'पारू' मालिकेने अचानक घेतला प्रेक्षकांचा निरोप; मुख्य अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT