Nana Patole Sakal
पुणे

काँग्रेसच देश सांभाळू शकते - नाना पटोले

भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणे सुरू आहे. त्याला जनता कंटाळली आहे. राहुल गांधी यांच्याकडे व्हिजन आहे.

सकाळ वृत्तसेवा

भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणे सुरू आहे. त्याला जनता कंटाळली आहे. राहुल गांधी यांच्याकडे व्हिजन आहे.

पुणे - भाजपकडून (BJP) केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणे सुरू आहे. त्याला जनता कंटाळली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडे व्हिजन (Vision) आहे. या देशाला पुढच्या काळात काँग्रेस (Congress) सांभाळू शकते, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला.

पुण्यात कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. सोनिया गांधी या ‘यूपीए’चे नेतृत्व करण्यास सक्षम आहेत, असे ट्विट पाटोले यांनी केले होते. त्यावर विचारले असता ते म्हणाले, ‘‘देशपातळीवर भाजपला मोडीत काढायचे असेल, तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही. राज्य पातळीवरील पक्षांनी याचा विचार केला पाहिजे. नाही केला तर ती भाजपला मदत करण्यासारखे आहे.’’

पक्षाच्या आमदारांनी सोनिया गांधी यांना भेटीची वेळ मागितली आहे, त्यावर बोलताना ते म्हणाले, ‘‘हे तीन पक्षाचे सरकार आहे. थोडं कमी जास्त होणारच. आमदार आपल्या मतदार संघात काम. करतात त्यांना पक्ष अध्यक्षांना भेटायची इच्छा असते ते भेटू शकतात. त्यासाठी भाजपच्या प्रमाणपत्राची गरज नाही. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आमदार भेटायला जाणार आहे, त्याचा इतका बाऊ विरोधक का करत आहेत. हे कळत नाही.’’

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शरद पवार यांना ‘युपीए’चे अध्यक्ष करावे, असा ठराव केला आहे. त्यावर पटोले म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीने काय ठराव करायचा हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. पण देशात भाजपला काँग्रेसच पर्याय आहे. त्यामुळे कोणी काय ठराव करायचा त्यांचा प्रश्न.’’

कोकणाला निसर्गाने भरभरून दिले. पण पाहिजे तसा विकास तिथे झाला नाही. नाणारबद्दल गैरसमज होतील असे वातावरण पसरवले आहे. सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा आणि लोकांमधील गैरसमज दूर करावा. तरीही लोकांचा विरोध असेल तर विदर्भात जागा आहे. तिथे हा प्रकल्प घेऊन जाऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्रात जागा आहे, राज्याच्या बाहेर जाऊ नये याची काळजी घ्यावी. या प्रकल्पामुळे निसर्गाला कुठेही हानी पोचणार नाही असं मी ऐकलंय.

- नाना पटोले, प्रदेश अध्यक्ष, काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT