Only the final semester students backlog will be examined 
पुणे

विद्यार्थ्यांनो, विषय बॅकलॉग राहिलेत; परिक्षा होणार की नाही? वाचा 'ही' महत्वाची बातमी

सकाळवृत्तसेवा

पुणे : "आमचे विषय बॅकलाॅग राहिले आहेत, त्याची परीक्षा होणार का?" हा प्रश्न प्रथम,द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना पडला आहे. त्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्टता आणली आहे. केवळ अंतिम वर्षाच्या अंतीम सत्राच्या विद्यार्थ्यांची बॅकलाॅगची परीक्षा होईल इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांची बॅकलाॅगची परीक्षा नवीन शैक्षणिक वर्षात होणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
राज्य सरकारने विद्यापीठ व महाविद्यालयीन परीक्षांचा निर्णय नुकताच जाहीर केला. त्यामध्ये अंतीम वर्षाच्या व अंतीम सत्रांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा जुलै महिन्यात घेतली जाणार आहे असे स्पष्ट केले आहे. पण ज्यांचे मागच्या वर्षीचे काही विषय राहिले आहेत त्यांचे काय होणारा हे स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत होते. विशेषतः  ज्या विद्यार्थ्यांना आता तिसऱ्या व चौथ्या वर्षात प्रवेश दिला जाणार आहे, त्यांना प्रथम व दुसऱ्या वर्षाच्या सर्व विषयात उत्तीर्ण होणे गरजेचे असते. मात्र यंदा बॅकलाॅगची परीक्षा होणार की नाही. मग आपण पुढच्या वर्गात कसे जाऊ असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता. 

मोठी बातमी : रांगेत न थांबता दारू मिळणार; पुण्यात ई-टोकनला सुरवात!

याबाबत पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डाॅ. महेश काकडे म्हणाले, "राज्य सरकारच्या सुचनेनुसार आता केवळ शेवटच्या सत्राच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे, त्यामुळे त्यांच्याच बॅकलाॅगच्या विषयांची परीक्षा होईल. इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे, त्यांना नापास केले जाणार नाही. त्यांच्या बॅकलाॅगची परीक्षा नवीन शैक्षणिक वर्षात घेतली जाईल.

रेशनकार्डाच्या नियमात केंद्राकडून बदल; तब्बल एवढ्या लोकांना होणार फायदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विमान अपघात घडवून आणण्याचा कट आधीच शिजलेला? कोणाचा सहभाग? 'यूएई'ने दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

IND vs WI: ४०६ धावांचा थरार, भारताचा विक्रमी विजय; पण गंभीर भडकला! ‘हे क्रिकेट नाही, फक्त बॅटिंग आहे’, खेळपट्टीवरून सुनावलं

Latest Marathi News Live Update: फुरसुंगीत सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त

Diveagar Beach Drowning : रायगडमधील दिवेआगर समुद्रकिनारी मोठी दुर्घटना; पुण्यातून सहलीला गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू

Yoga for Diabetes: काही मिनिटांचं मंडूकासन अन् शरीराला मिळतील ‘हे’ फायदे! जाणून घ्या डायबिटीसवर कसं आहे प्रभावी

SCROLL FOR NEXT