The operations of Jumbo Covid are now under the control of Pune Municipal Corporation 
पुणे

जम्बो कोवीडचे कामकाज आता पुणे महापालिकेच्या नियंत्रणात

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यातील जम्बो कोवीड हॉस्पिटलमध्ये निर्माण झालेल्या सुविधांची वानवा आणि बेजबाबदार कारभाराच्याअनेक तक्रारी येत आहेत. दरम्यान, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी जम्बो कोवीडचे कामकाज आता पुणे महापालिकेच्या नियंत्रणात राहणार आहे असल्याची सुचना विभागीय आयुक्तांनी दिली आहे अशी माहिती आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

जम्बो कोवीडच्या स्थितीबाबत काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जम्बो रुग्णालयातील सुविधांबाबत विभागीय आयुक्तांना सूचना दिल्या आहेत असे सांगितले. ''पुण्यातील जम्बो रुग्णालयाबद्दल तक्रार आल्या. तिथं अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून नीट जमत नसेल तर संबंधितांवर कारवाई करा. त्याठिकाणी नवीन टीम आणि तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करा. डॉक्टरांचा सल्ला घ्या असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.'' दरम्यान, आज जम्बो कोवीडसेटरमध्ये सध्या कोरोना रुग्णांना जागेवरच जेवणाची सोय करण्यात आली असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी कोवीड हॉस्पिटलमध्येच तळ ठोकला आहे. 



पुण्यातील 'जम्बो' अगदीच 'क्रिटिकल' झाल्यानंतर त्याचा ताबा घेऊन व्यवस्थेचीच नेमकी "सर्जरी' करण्याची जबाबदारी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडे सोपविली गेली आहे. दरम्यान, ''कामकाज हाती घेतल्यानंतर त्याबाबत, ''जम्बो कोवीड सेंटरचे काम पाहाणाऱ्या संस्थेवर कारवाई होणार असून 24 तासांची नोटीस बजावली आहे, तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नवीन टीम आणि तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक तेथे केली आहे.'' अशी माहिती 'सकाळ'ला दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Mumbai Local Mega Block : कांदिवली-बोरिवलीदरम्यान रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक; लोकल वाहतुकीत बदल

Talegaon Station News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्तेकामाचा अंतिम अध्यादेश जारी; डीबीओटी तत्वावर होणार काम

Maharashtra: आधार आणि किसान आयडी ब्लॉक, सरकारी योजनांपासून दूर ठेवणार अन्...; शेतरस्त्यावर अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई होणार

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार केले, नंतर...; धक्कादायक कृत्याने खळबळ, काय घडलं?

SCROLL FOR NEXT