Chartered_Accountant sakal
पुणे

शिकतानाच कमविण्याची सनदी लेखापालांना संधी

‘आयसीएआय’तर्फे उपक्रम; विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण बनवणार

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड : सनदी लेखापालाचे (सीए) शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा तसेच त्यांच्यातील कौशल्याचा विकास व्हावा, यासाठी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) ‘ट्रेन, अर्न अँड लर्न’ (टेल) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबत ‘आयसीएआय’च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) अध्यक्ष सीए मनीष गादिया यांनी माहिती दिली. (Pune News)

बिबवेवाडीतील आयसीएआय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. प्रसंगी केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, ‘डब्ल्यूआयआरसी’च्या उपाध्यक्षा सीए दृष्टी देसाई, सचिव सीए अर्पित काबरा, ‘विकासा’चे अध्यक्ष सीए यशवंत कासार, विभागीय समितीचे सदस्य सीए आनंद जाखोटिया, सीए उमेश शर्मा, पुणे शाखेचे अध्यक्ष व खजिनदार सीए समीर लड्डा, उपाध्यक्ष व सचिव सीए काशिनाथ पठारे आदी उपस्थित होते. ‘सहकार’ विषयावर आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘डब्ल्यूआयआरसी’चे पदाधिकारी पुणे भेटीवर आले आहेत.

गादिया म्हणाले, ‘नोकरी अथवा व्यवसाय करण्यापूर्वी सनदी लेखापालातील नवनवीन कौशल्य विकसित व्हावीत, तसेच शिकतानाच त्यांना रोजगार मिळावा, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. ३६ तासांचा हा अभ्यासक्रम असून, त्याचे शुल्क २०० रुपये आहे. हा अभ्यासक्रम केल्यानंतर विद्यार्थ्यांना सीएकडे इंटर्नशिप देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर त्याला मानधन मिळणार आहे.’

चितळे म्हणाले, ‘इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून नेहमी शासनाला मदत होत असते. देशातच नव्हे तर संपूर्ण जगात चार्टर्ड अकाउंटंट्सची मागणी आहे. सहकार क्षेत्रात सनदी लेखापालांची भूमिका महत्वपूर्ण आहे. त्या दृष्टीने या दोन दिवसांच्या चर्चासत्रात विचारमंथन झाले. येत्या काळात सहकार क्षेत्राला अधिकाधिक गती देण्यासाठी सनदी लेखापाल आपले योगदान देतील.’

मंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते उदघाटन

राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते ‘सहकार’ विषयावरील दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन झाले. महाराष्ट्राला सहकार क्षेत्राची मोठी परंपरा आहे. या क्षेत्राला अधिकाधिक प्रगतिपथावर नेण्यासाठी सनदी लेखापालांचे सक्रिय योगदान महत्त्वाचे असल्याचे विश्वजित कदम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT