silc 
पुणे

"एसआयआयएलसी' तर्फे घरबसल्या ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याची संधी 

सकाळवृत्तसेवा

पुणे - लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे प्रशिक्षण, वेबिनार घेण्यासाठी सध्या सर्वत्र ऑनलाईनचा पर्याय अवलंबला जात आहे. हे लक्षात घेऊन "एसआयआयएलसी'तर्फे बोअरचे पाणी कसे वाढवावे आणि घरबसल्या आंबा विक्रीचे पर्याय या विषयांवर अनुक्रमे ता. 9 आणि 10 मे रोजी ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. 

उन्हाळ्यात बहुतांश बोअरचे पाणी कमी झाल्यामुळे बोअर कमी वेळ चालण्याची समस्या उद्‌भवते. प्रशिक्षणात बोअरची पाणीपातळी वाढवण्याचे तंत्रज्ञान, पाणीपुरवठा शाश्वत कसा करावा, पाणी कसे टिकवावे, बोअऱ रिचार्जसाठी किती खर्च येतो, त्याचे फायदे इ.चे बोअर विषयाच्या प्रशिक्षणात मार्गदर्शन होईल. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

प्रतिकूल परिस्थितीत आंबा उत्पादकांना नुकसानीची भीती आहे. काय करायचं उमगत नाही. ऑनलाईन प्रशिक्षणात घरबसल्या आंब्याला बाजारपेठेची माहिती, सद्यस्थितीत उत्पादकांना माल वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल का, नुकसान टाळण्यासाठी आंबा प्रक्रियेचे तंत्रज्ञान, मूल्यवर्धनामुळे कसा फायदा होऊ शकतो इ.चे आंबा विषयाच्या प्रशिक्षणात मार्गदर्शन होईल. 

प्रशिक्षण विषयः 1) बोअरचे पाणी कसे वाढवावे, शनिवार, ता.9 मे 2020, वेळ सकाळी 11.30 ते 12.30 शुल्कः रूपये 400 नावनोंदणीसाठी संपर्कः 9767592525 / 9146038031 
2) घरबसल्या मिळवा आंबा विक्रीचे पर्याय, रविवार, ता.10 मे 2020, वेळ सकाळी 11.30 ते 12.30, शुल्कः रूपये 400, नावनोंदणीसाठी संपर्क : 9623793171 / 9881099426 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs DC Live : समीर रिझवीचा तांडव! शतक हुकले, दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबईची हार, Point Table मध्ये मोठी उलथापालथ

पार्क केलेली थार अचानक रिव्हर्स आली, महिलेचा चिरडून मृत्यू; VIDEO VIRAL

धक्कादायक! जत्रेतील आकाशपाळणा कोसळून मोठी दुर्घटना, ४० जण जखमी, Video Viral

Latest Marathi News Live Update : मुंबईहून 18 टन ऑटो LPG संभाजीनगरमध्ये जाणार

Nanded Gangwar: नांदेडमध्ये मध्यरात्री गॅंगवार; जुन्या वैमनस्यातून तलवार-खंजीर हल्ल्यात तिघांचा खून, शहरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT