पुणे

इंटरनॅशनल पेन फेस्टीवलमध्ये जगविख्यात पेन पाहण्याची संधी

5 तोळे सोने ते जॅपनीज झाडांपासून बनविलेले उरुशी पेनच विंटेज व किमती पेनचे प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तब्बल 6 लाखांचा 18 कॅरट गोल्डपासून बनविलेला 5 तोळ्यांचा चमचमचा बाॅलपेन...दुबई शहर साकारलेला संपूर्ण चांदीचा पेन...जगभरात मोजके म्हणजे केवळ 516 पेन असलेला शुद्ध चांदीपासून बनविलेला अडीच लाखांचा पेन....जॅपनिज झाडांपासून बनविलेला आणि सोने तसेच प्लॅटीनम पावडरमध्ये नक्षीकाम केलेला उरुशी पेन...सोन्याची निब असलेला दीड लाखांचा डिप्लोमॅट पेन त्यासोबतच सुंगधी शाई, सोन्याची पावडर असलेली शाई असे पेन आणि शाईचे विविध प्रकार पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली.

पुण्यामध्ये इंटरनॅशनल पेन फेस्टीवलचे आयोजन आपटे रस्त्यावरील हॉटेल रामी ग्रँड येथे व्हिनस ट्रेडर्सतर्फे करण्यात आले. फेस्टीवलचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, फ्लेअर पेनचे चेअरमन खुबीलाल राठोड, कुमार प्रॉपर्टीजचे केवलकुमार जैन, न्युरोलॉजिस्ट डॉ. राजस देशपांडे, पीएनजीचे सौरभ गाडगीळ, सुरेंद्र करमचंदानी आदी मान्यवर उपस्थित होते.

पार्कर, वॉटरमन, मॉन्टब्लँक जर्मनी, वॉल्डमन, शेफस, मॉन्टव्हर्दे, स्क्रिक्स टर्की, लॅमी जर्मनी, पायलट, प्लॅटिनम, फ्लेक्सबुक ग्रीस, लिओनार्डो, मॅग्ना कार्टा या आणि अशा जगविख्यात तब्बल 2 हजारापेक्षा अधिक पेन प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. फेस्टीवलमध्ये २०० रुपयापासून ते 6 लाख रुपये किमतीचे पेन असून फाउंटन पेन, बॉल पेन, रोलर पेन, मल्टीफंक्शनल पेन, कॅलिग्राफी पेन,यांत्रिक पेन्सिल, शाईची विविध ५०० श्रेणी पेन फेस्टीवलमध्ये आहेत.

सुरेंद्र करमचंदानी म्हणाले, आजच्या डिजीटल युगात फाऊंटन पेनच्या वापराला प्रोत्साहन मिळावे आणि फाऊंटन पेनाने लेखनाचा आनंद घेता यावा, यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील विविध प्रकारचे पेन पुणेकरांना पाहता व खरेदी देखील करता येणार आहेत. दिनांक १२ डिसेंबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत आपटे रस्त्यावरील हॉटेल रामी ग्रँड येथे पेन फेस्टीवल सुरु असून सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT