Orange 
पुणे

संत्र्यानं खाल्ला भाव; तीन डझनाच्या पेटीला विक्रमी ६०० रुपयांची बोली

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड (पुणे) : फळबाजारात रविवारी (ता.२१) विक्रीसाठी आलेल्या संत्र्यांना विक्रमी भाव मिळाला. बाजारात तीन डझनाच्या संत्र्यांच्या २३० पेट्या आल्या होत्या. त्यातील प्रत्येक पेटीला ६०० रुपये भाव मिळाला.

नगर जिल्ह्यातील कात्रड गावातील शेतकरी प्रकाश दारकुंडे यांनी रविवारी एक टेम्पो संत्री बाजारात विक्रीसाठी पाठविली होती. त्यातील प्रत्येक पेटीला ६०० रुपये भाव मिळाला. तसेच बाजारात इतर संत्र्यांना प्रतवारीनुसार तीन डझनाच्या एका पेटीला ४०० ते ५००, चार डझनाच्या एका पेटीला २५० ते ३०० रुपये भाव मिळाला. आठ दिवसांनी संत्र्याचा दुसरा बहर सुरू होणार असल्याची माहिती व्यापारी कैलास जयसिंघानी यांनी दिली.

बाजारात मिरग बहारातील संत्रीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. रविवारी फळबाजारात १० ते १२ टेम्पो संत्री आवक झाली. दारकुंडे यांनी पाठविलेली संत्री दर्जेदार होती. फळांचा आकार मोठा असून चवीला गोड आहे. त्यामुळे संत्र्यांना उच्चांकी भाव मिळाल्याचे व्यापारी जयसिंघानी यांनी सांगितले.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar: महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! एकनाथ शिंदेंचे कौतुक, उद्धव ठाकरे गटाला धक्का; कारण सांगत ओमराजेंनी स्पष्ट केली भूमिका

विद्यार्थ्यांना त्रास नको म्हणून मोदींची संवेदनशीलता; NEET सुरू होईपर्यंत 45 मिनिटे विमानतळावर केली प्रतीक्षा

Maharashtra Monsoon: मान्सून ज्याच्यामुळे रखडला ते सोमाली जेट आहे काय?

Groundwater Protection: पुणे जिल्ह्यात धोकादायक विहिरींचे सर्वेक्षण व बेकायदेशीर बोअरवेलवर नियंत्रणाची मागणी; भूजल संवर्धनासाठी ठोस उपाययोजनांचा आग्रह

माढा कसबा पेठेतील ऐतिहासिक विठ्ठल Madha Vitthal Temple restoration: मंदिराला प्राचीन रूप परतवण्यासाठी सॅंड ब्लास्टिंगद्वारे रंग काढण्याचे काम; भाविकांसाठी दर्शन तात्पुरते बंद

SCROLL FOR NEXT