Secondary minerals
Secondary minerals sakal
पुणे

नांदोशी येथील अवैध गौण खनिज उत्खनन बंद करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

किरकटवाडी:नांदोशी (ता. हवेली) येथील अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे सुरू असलेले गौण खनिज उत्खनन तात्काळ बंद करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी हवेली तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांना दिले आहेत. किरकटवाडीचे माजी उपसरपंच हरेश मंडले यांच्या तक्रार अर्जावरुन सदर कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच किरकटवाडी व नांदोशीच्या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानेही जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांची भेट घेऊन नियमबाह्य गौण खनिज उत्खनन बंद करण्यासाठी निवेदन दिले होते.

गौण खनिज उत्खनन तात्काळ बंद करण्याचे आदेश

निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी आदेशात नमूद केल्यानुसार नांदोशी येथे सध्या चार ते पाच दगडखाणींतून गौण खनिज उत्खनन सुरू असून त्यापैकी केवळ कविता संदीप रानवडे यांच्या खाणीचा परवाना सद्यस्थितीत सुरू आहे. इतर खाणींचे परवाणे मागील सुमारे दोन ते तीन वर्षांपूर्वीच संपलेले आहेत. असे असताना राजरोसपणे येथील खाणींतून बेकायदा गौण खनिज उत्खनन सुरू आहे. यातून शासनाचाही करोडो रुपयांचा महसूल बुडाला आहे.

किरकटवाडीचे माजी उपसरपंच हरेश मंडले यांनी अवैध गौण खनिज उत्खनन होत असल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार अर्ज केले होते. तसेच अनेक वेळा याबाबत पाठपुरावा केला होता. किरकटवाडी येथे एका कामगाराचा गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपर खाली चिरडून मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनीही संबंधित विभागाकडे अवैध उत्खनन व वाहतूक थांबविण्यासाठी निवेदन सादर केले होते. त्याबाबत दखल घेऊन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी हवेली तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांना परवाना संपलेल्या दगडखाणी बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT