पुणे

अवयवदानाबाबत बारामतीत जागृती

CD

बारामती, ता. १३ : येथील महिला रुग्णालयात ‘जुग जुग जिओ’ अभियानांतर्गत अवयवदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली. अवयवदानाचे महत्त्व पटवून देत यावेळी अनेक नागरिकांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प करून तशी शपथ घेतली.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत अवयवदानाचा संदेश पोहोचवण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मार्गदर्शन करण्यात आले. अवयवदानाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून, मृत्यूनंतर अवयवदानाची प्रक्रिया कशी असते, याची सविस्तर माहिती देण्यात आली. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, यावर यावेळी भर देण्यात आला.
या मोहिमेत सहभागी होऊन अवयवदानाचा संकल्प करणाऱ्या नागरिकांचा रुग्णालयातर्फे सत्कार करण्यात आला. महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई, वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर बेलदार आणि सुरेखा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blinkit-Zepto वरून सामान मागवलं... पण मॅन्युफॅक्चरिंग डेटच गायब! आता काय करायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला उपाय

Supreme Court: ''आता ही शेवटची संधी..'' पॅकिंग फूडवरील इशाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालय आक्रमक, सरकारसह FSSAI ला अल्टिमेटम

Snake in Railway : पुणे-दानापूर एक्सप्रेस मध्ये साप; प्रवाशांमध्ये घबराट

Pune News : पथ विभागाच्या कामांची होणार पोलखोल? महापौरांनी मागितला आठ दिवसात अहवाल

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT