Organ Donation first body donation took place Baramati record of historic moment pune health doctor baramati sakal
पुणे

Organ Donation : बारामतीत झाले पहिले देहदान...ऐतिहासिक क्षणाची नोंद...

नव्याने सुरु झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे आता बारामतीत देहदान शक्य होणार आहे.

मिलिंद संगई, बारामती.

बारामती - शहराच्या इतिहासातील पहिले देहदान आज झाले. नव्याने सुरु झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे आता बारामतीत देहदान शक्य होणार आहे. महाविद्यालय सुरु झाल्यानंतर प्रथमच अमृतलाल गांधी यांनी देहदान केले.

त्यांनी काही महिन्यांपूर्वी देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे लहान बंधू किरण गांधी यांनी त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केला. किरण गांधी यांना महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

शुक्रवारी (ता. 30 डिसेंबर) अमृतलाल गांधी (वय 72) यांचा देह त्यांच्या घरून शासकीय महाविद्यालयात आणला गेला. शरीररचनाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गीतांजली सुडके, उप अधिष्ठाता डॉ. अंजली शेटे, डॉ.वसीम हिरोली, किरण घुगे यांनी त्याचा स्विकार केला.

बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यानंतर चार वर्षात प्रथमच देहदान झाले व देह स्विकारला गेला. संशोधनाच्या उद्देशाने त्याचा भविष्यात विनियोग होणार असल्याचे सांगण्यात आले. बारामतीत प्रथमच देहदान होऊन देह स्विकारण्याची घटना घडली आहे.

...ऐतिहासिक क्षणाची नोंद.....

बारामतीत या पूर्वी देह स्विकारण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. देह स्विकारण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची गरज असते. बारामतीत महाविद्यालय सुरु होऊनही चार वर्षे झाले पण देहदानासाठी कोणी पुढे आले नव्हते, अमृतलाल यांनी ते हयात असताना देहदानाची इच्छा प्रदर्शित केलेली होती, आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान केले.

देहदानाचे महत्वच वेगळे...

जैन समाजात दानाचे अनन्यसाधारण महत्व आहे मात्र देहदान करुन अमृतलाल गांधी यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान आम्ही कुटुंबियांनी केले.- किरण गांधी, बारामती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT