पुणे

अवयवदानातून २०७ रुग्णांना नवजीवन

CD

पुणे, ता. १४ : अठरावर्षीय समीरचा (नाव बदललेले) अपघात झाल्‍याने व डोक्‍याला गंभीर मार लागल्‍याने त्‍याला रुग्‍णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी शर्थीचे प्रयत्‍न करूनही तो बरा झाला नाही. त्‍याला डॉक्‍टरांनी मेंदूमृत (ब्रेनडेड) घोषित केले. दुःख झालेले असतानाही, त्‍याच्‍या कुटुंबीयांनी त्‍याच्‍या अवयवदानाला संमती दिल्‍याने त्‍याचे महत्त्वाचे अवयव इतर रुग्‍णांवर प्रत्‍यारोपित करण्‍यात आले व अनेकांच्या आयुष्यात नवजीवन फुलवले.

समीरप्रमाणे २०२१ मध्ये ४४ जणांनी केलेल्‍या विविध अवयवदानांद्वारे ९७ जणांवर अवयव प्रत्यारोपण केले होते. त्‍यामध्‍ये सातत्‍याने वाढ होत आहे. अवयवदानाबाबत वाढती जनजागृती, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती आणि समन्वय यामुळे गेल्या पाच वर्षांत पुणे विभागात अवयव प्रत्यारोपणात मोठी वाढ झाली आहे. अवयव प्राप्तकर्त्यांची संख्या २०२५ मध्ये थेट २०७ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर अवयवदात्यांची संख्याही पाच वर्षांपूर्वी ४४ होती, ती आता ७९ पर्यंत वाढली आहे. पुणे विभागीय अवयव प्रत्‍यारोपण समन्‍वय समिती (झेडटीसीसी) आणि पुणे परिमंडळ आरोग्‍य उपसंचालक कार्यालयाने ही माहिती दिली आहे.

अवयवदान म्हणजे एखाद्या व्यक्तीचे निरोगी अवयव किंवा उती (टिश्‍यू) दुसऱ्या रुग्णाला प्रत्यारोपणासाठी दान करणे होय. रुग्‍ण मेंदूमृत झाल्‍यावर त्‍याचे हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे, स्वादुपिंड तसेच डोळे, त्वचा यांसारखे अवयव दान करता येतात. यामुळे अनेक गंभीर रुग्णांना नवजीवन मिळते तसेच अनेकांचे प्राण वाचू शकतात.

अवयवदानाबाबत समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत असून मेंदूमृत रुग्णांच्या नातेवाइकांकडून पुढाकार वाढत आहे. वेळेत नातेवाइकांचे समुपदेशन, ग्रीन कॉरिडॉर व्यवस्था आणि रुग्णालयांमधील समन्वय यामुळे अधिकाधिक रुग्णांना जीवनदान मिळत आहे, अशी माहिती पुणे परिमंडळाचे आरोग्‍य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी दिली.

पाच वर्षांतील अवयवदान आणि प्रत्यारोपण (स्‍त्रोत : झेडटीसीसी, पुणे)
वर्ष दाते अवयव प्रत्यारोपण
२०२१ : ४४ ९७
२०२२ : ४६ ११८
२०२३ : ५८ १५८
२०२४ : ७० १८१
२०२५ : ७९ २०७

अवयवनिहाय प्रत्यारोपण
वर्ष मूत्रपिंड यकृत हृदय फुफ्फुस हृदय व फुफ्फुस
२०२१ : ४९ ४१ २ ० ०
२०२२ : ६६ ४४ २ ० २
२०२३ : ७४ ४३ ९ १० १
२०२४ : ९३ ५८ ६ १४ १
२०२५ : ११७ ६७ ४ १३ १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT