पुणे

मातीतील सेंद्रिय कर्बाचा धोकादायक ऱ्हास; महाराष्ट्रातील शेती संकटाच्या उंबरठ्यावर? कृषी विभागाने तपासले 55970 माती नमुने

CD

TVS26A00038

५५ हजार ९७० नमुन्यांची तपासणी;
जिल्ह्यातील मातीतील सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास

जमिनीतील कर्बाचे प्रमाण ०.२ ते ०.४; ०.६ पेक्षा अधिक असणे अपेक्षित

पांडुरंग सूर्यवंशी : सकाळ वृत्तसेवा
तावशी, ता. ७ : जिल्ह्यात कृषी विभागाने तपासलेल्या ५५ हजार ९७० माती नमुन्यांमध्ये सर्वसाधारणपणे ०.२ ते ०.४ या प्रमाणात सेंद्रिय कर्ब आढळून आला आहे. मात्र, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.६ पेक्षा अधिक असणे अपेक्षित असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली.
सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीची सुपीकता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होतो. एकाच पिकाची सातत्याने लागवड, पिकांचे अवशेष जाळणे, सेंद्रिय खतांचा कमी वापर, शेणखताची घटती उपलब्धता आणि हवामानातील बदल ही सेंद्रिय कर्ब घटण्याची प्रमुख कारणे आहेत. सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत आणि हिरवळीच्या खतांचा वापर करणे, पिकांचे अवशेष न जाळता जमिनीत मिसळणे, पीक फेरपालट करणे आणि नियमित मृदा परीक्षणाच्या आधारे खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

कोट...
‘सेंद्रिय कर्ब बाजारात विकत मिळत नाही. शेतातील पालापाचोळा किंवा घाण जाळण्याऐवजी तो खड्डा करून कुजवावा. बायोमास जमिनीत गाडल्यास सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. जमिनीत ०.६ पेक्षा अधिक सेंद्रिय कर्ब असणे अपेक्षित आहे.’
- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

‘महाराष्ट्रातील बहुतांश जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चिंताजनक पातळीवर घसरले आहे. शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत, हिरवळीचे खत आणि पीक अवशेष जमिनीत मिसळणे, तसेच पीक फेरपालट करणे आवश्यक आहे. रासायनिक खतांचा संतुलित वापर आणि मृदा परीक्षणाच्या आधारे खत व्यवस्थापन केल्यास जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.’
- हर्षद ढवळे, बीएससी ॲग्री शिक्षित शेतकरी, कासेगाव

चौकट...
सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी...
- नियमित मृदा परीक्षण
- शेणखत, कंपोस्ट, गांडूळखताचा वापर
- पीक अवशेष न जाळता जमिनीत मिसळणे
- पीक फेरपालट व हिरवळीच्या खतांचा वापर
- पाणी व खतांचे संतुलित व्यवस्थापन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रशांत किशोरांची पवार कुटुंबासोबत बैठक; सुनील तटकरे अनभिज्ञ; म्हणाले, ''ते आमच्यासाठी काम करतायेत माहीत नाही''

Abhijeet Dipke: घरासमोर CID अधिकारी, 'हिट स्प्रे' ग्रुपचा दावा अन्... DCP ला थेट फोन करत अभिजीत दिपकेंचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime: फ्री वायफाय वापरणं महागात पडलं! वरिष्ठ बँक अधिकाऱ्याचा फोन हॅक, भामट्यांकडून २८ मिनिटांत ४ लाखांचा व्यवहार

Rohit Sharma: रोहित नाही तर कोण? 2027 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाकडे सलामीचे हे 3 पर्याय; एक नाव सर्वात आघाडीवर

FDA Crime : आयुर्वेदिक औषधांत आढळली बुरशी अन्‌ अळ्या; इंड्युकेअर फार्माचा उत्पादन परवाना रद्द

SCROLL FOR NEXT