पुणे

घरगुती कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती कार्यशाळा

दत्ता म्हसकर

जुन्नर - घरगुती कचऱ्यापासून चांगल्या प्रतीचे सेंद्रिय खत तयार घरच्या घरी करता येते असे  विभागीय तांत्रिक सल्लागार पायल काफरे यांनी येथे सांगितले. 

येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जुन्नर नगर परिषदेच्या वतीने आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करुन ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्माण करावे. हे खत बागेसाठी व शेतीसाठी वापरता येऊन सेंद्रिय शेती साठी उपयुक्त राहील.

मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले. आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत खत्री यांनी नगर परिषदेने राबविलेले स्वच्छतेचे उपक्रम सांगितले. या कार्यशाळेत राष्ट्रीय सेवा योजनेचे १३२ स्वंयसेवक सहभागी झाले होते, त्यांनी प्रश्न विचारुन आलेल्या शंकाचे निरसन करून घेतले. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यशाळेचे नियोजन व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष गवळी यांनी केले. सूत्रसंचलन अक्षय निर्मळ यांनी केले आभार प्रा.राहूल सहाणे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT