पुणे

नगर- सुपीकता, उत्पादकता वाढीसाठी जैविक खतांचा वापर गरजेचा बाळासाहेब थोरात ः शेतकऱ्यांना जैविक किटचे वितरण

CD

सुपीकता, उत्पादकता वाढीसाठी
जैविक खतांचा वापर गरजेचा

बाळासाहेब थोरात : शेतकऱ्यांना जैविक किटचे वितरण

ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : कमी पाऊस आणि वातावरणातील बदलांमुळे पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. हुमणी अळी, पायरीला, खोडकिडा आणि पांढरी माशी यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव कमी करण्याबरोबरच जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी जैविक खतांचा वापर उपयुक्त ठरतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जैविक खतांचा वापर करावा, असे आवाहन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), भारतीय ऊस संशोधन संस्था आणि जैविक नियंत्रण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती उपयोजना कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना जैविक किटचे वितरण केले. माजी महसूलमंत्री श्री. थोरात, कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले, शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर बोरसे, डॉ. योगेश थोरात, संपत गोडगे, रामनाथ कुटे, सतीश वर्पे, योगेश भालेराव, दिलीप नागरे, रावसाहेब दुबे, सुंदराबाई दुबे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आणि ऊस विकास अधिकारी बाळासाहेब सोनवणे आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, यावर्षी पाऊस कमी झाल्याने राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. वातावरणातील बदलांमुळे पिकांवरील किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. हुमणी अळी, पायरीला, खोडकिडा आणि पांढरी माशी यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून जैविक खतांचा वापर केल्यास जमिनीची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते, तसेच जमिनीतील हवा खेळती राहते, शेतीचा खर्च कमी होतो आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास हातभार लागतो. प्रास्ताविक बाळासाहेब सोनवणे यांनी केले, तर पांडुरंग घुले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

Navratri Day One: आज करा पहिल्या माळेच्या देवी शैलीपुत्रीची पूजा! जाणून घ्या पूजाविधी, नैवेद्य आणि मंत्र

‘या’ मुजरा शैलीतील गाण्यासाठी रेखांनी 3 दिवस केली फक्त बोटांची प्रॅक्टिस; जुन्या गाण्याचा भन्नाट किस्सा माहितीये का?

मेट्रो-इंटरनेट सुरू करा, बॅरिकेड्स हटवा; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईपर्यंत...; सुप्रीम कोर्टाचे दिल्ली पोलिसांना आदेश

CJP आंदोलनाचा व्यापाऱ्यांना फटका, २ हजार कोटींचं नुकसान; व्यवसाय ठप्प, CTIने केली 'ही' मागणी

SCROLL FOR NEXT